महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी; मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, आज (रविवार) मुंबईत एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रातील मृतांची संख्या 7 वर पोहचली आहे.

राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या 26 रुग्णांवर यशस्वी उपचारांमुळे खडखडीत बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये शनिवारी आणखी 28 रुग्णांची भर पडली होती. आता ही संख्या आज आणखी वाढली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबईचे आहेत. तर, दोन रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर 4 रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. पुण्यात तीन जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या 104 रुग्णांना आजाराची कोणतेही लक्षण नाही. तर, 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

शनिवारी मुंबईत डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आज, पुन्हा एकदा कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेकडून चालविण्यात येणाऱ्या एमसीजीएम रुग्णालयात या 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला 28 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना श्वासोश्वासास त्रास होत होता. त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. या महिलेच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील मृतांची संख्या 7 झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT