Corona Warriors esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Warriors : राज्यातील ४० हजार कोरोना योद्धे वाऱ्यावर; राज्य सरकारचा काणाडोळा

राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत (एनएचएम) येणाऱ्या राज्यातील ४० हजार कंत्राटी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

राज इंगळे

अचलपूर, (जि. अमरावती) - राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत (एनएचएम) येणाऱ्या राज्यातील ४० हजार कंत्राटी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. संपाला एक महिना पूर्ण होऊन सुद्धा त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार काणाडोळा करीत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी देशावर आलेल्या कोरोना साथीच्या संकटात कोरोना योद्ध्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता राज्यातील जनतेला सुखरूप ठेवले होते. मात्र, हेच कोरोना योद्धे आज सरकारकडे नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी मागील ३० दिवसांपासून करीत आहेत. परंतु सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.

जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे चित्र आज दिसत आहे. या संपात राज्यभरातील जवळपास १६७ प्रकारच्या योजनांत काम करणारे ४० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागील २५ वर्षांपासून हे कंत्राटी कामगार अल्प मानधनावर काम करीत आहेत. असे असतानाही शासकीय सेवेत सामावून घेण्यासह इतरही मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या २५ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे.

शासनाने अद्याप त्यांची दखल घेतली नसल्याने हे आंदोलन पुढेही सुरू राहणार आहे. सरकारने अजूनही आंदोलनाची दखल न घेतल्याने कोरोना काळात योद्धा म्हणून गौरविण्यात आलेले राज्यातील ४० हजार योद्धे वाऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांच्यात रोष निर्माण झाला आहे.

शासकीय कर्मचाऱ्याला जर महिन्याकाठी एक लाख रुपये वेतन मिळत असेल व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तेवढेच काम करूनसुद्धा महिना फक्त वीस हजार रुपये मिळत असतील तर कोणत्या मानसिकतेने काम करायचे? वेतनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत असेल तर आम्ही जगायचे तरी कसे?

- जयश्री साबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अमरावती

गेल्या महिन्याभरापासून आरोग्यमंत्र्यांसोबत अनेक बैठकी झाल्या. त्यामध्ये ते सकारात्मक वाटले. परंतु आमच्या मागण्या राज्य शासन जोपर्यंत लेखी स्वरूपात मान्य करीत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.

- प्रवीण बोरकर, मार्गदर्शक, कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT