सोलापूर : जिल्ह्यात २००९ ते २०२४ या काळात आठ लाख ८१ हजार मतदार वाढले आणि विशेष बाब म्हणजे २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात चार लाख ६१ हजार मतदार वाढल्याचे विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. सोलापुरातून नोकरी, शिक्षण, रोजगाराच्या निमित्ताने सर्वाधिक स्थलांतर होते, असे मानले जाते. तरीसुद्धा एवढे मतदार वाढले हे विशेष. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत त्यात आणखी किती मतदारांची वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यात २००९ ते २०१४ च्या पाच वर्षांत एक लाख ३१ हजार ७१६ मतदार वाढले. २०१४ ते २०१९ या काळात दोन लाख ८८ हजार ७३ आणि २०१४ ते २०२४ या पाच वर्षांत सर्वाधिक चार लाख ६१ हजार २५६ मतदार वाढले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांसह तरुण, ज्येष्ठांचे मतदान निर्णायक ठरले. ३० ऑगस्ट रोजी मतदार यादी अंतिम झाली, त्यावेळी जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ३७ लाख ६३ हजार ७८९ एवढी होती. त्यानंतर निवडणुकीपूर्वी पुरवणी यादीत ८५ हजार ८० मतदार वाढल्याचे पाहायला मिळाले. या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचेही दिसून आले.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपरिषदा व महापालिकेची निवडणूक होईल. तत्पूर्वी, बीएलओंच्या माध्यमातून मतदार जागृती कार्यक्रम राबविला जाणार असून त्यात आणखी मतदार वाढतील हे नक्की. कारण, १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या युवा मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते.
चार वर्षांतील मतदार अन् झालेले मतदान
(२००९)
एकूण मतदार
२९,६७,८२४
झालेले मतदान
१८,४९,६५६
----------------
(२०१४)
एकूण मतदार
३०,९९,५४०
झालेले मतदान
१८,५९,३४०
-------------------
(२०१९)
एकूण मतदार
३३,८७,६१३
झालेले मतदान
२०,७६,७६१
---------------
(२०२४)
एकूण मतदार
३८,४८,८६९
झालेले मतदान
२६,०६,५७१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.