5 August Deadline for participation in PM Kisan Samman Yojana till 
महाराष्ट्र बातम्या

तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळत नसतील तर ५ तारखेपर्यंत होणाऱ्या मोहीमेत सहभागी व्हा

अशोक मुरुमकर

अहमदनगर : जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला नाही, त्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबविणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना राबवली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. बँकेच्या खात्यात तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते. याचा लाभ ज्यांनी घेतला नाही. त्यांच्यासाठी राज्य सरकार 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविणार आहे.

यामध्ये ज्या लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. यासंदर्भाती त्यांनी ट्विट केले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 91 लाख 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात 6 हजार 949 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते.
राज्यात 1 कोटी 52 लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 4 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Pune News: नव्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले; बांधकामाला पाणी मारताना कैलास बेनके यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT