Rain
Rain 
महाराष्ट्र

अवकाळीने घेतला पाच जणांचा बळी

सकाळवृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड
पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, जनावरेही दगावली आहेत. सांगोला व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही घरांचे व छावण्यांचे नुकसान झाले.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील मंगळवारी (ता. २१) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून व घरावरील पत्रे पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक संकटात दहा जनावरांचा मृत्यू झाला असून १०३ घरांची पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी येथील रोहित लिंबण्णा सुतार (वय १६) अक्कलकोट तालुक्‍यातील करजगी येथील समर्थ नागनाथ गंगदे (वय १२), सांगोला तालुक्‍यातील घेरडी येथील हौसाबाई सोमा बिचकुले (वय ५८), घेरडी येथील दगडू दादा चोपडे (वय ३५) या चार जणांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे अंगावर घराचे पत्रे व दगड डोक्‍यात पडून आलेगाव येथील आर्तिका दिलीप देवकते हिचा मृत्यू झाला. बाळगी, करजगी, कडबगाव, तांडोर, रहाटेवाडी, बोराळे, नंदेश्‍वर, घेरडी, शिरभावी आणि सांगोल्यात मिळून दहा जनावरे दगावली आहे.

सोलापूरचा पारा ४४.३ अंशावर
यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद काल सोलापुरात झाली. त्यानंतर बुधवारीही उन्हाचा चटका कायम होता. आज सोलापुरात ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

वीज पडून बैलजोडी दगावली
औराद शहाजानी - औराद व परिसराला रात्री पाऊस झाला. औराद येथील पर्जन्यमापक केंद्रावर ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती पर्जन्यमापक मुक्रम नाईकवाडे यांनी दिली. मानेजवळगा (ता. निलंगा) येथील शेतकरी राजू तांबरवाडे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेली बैलजोडी वीज पडल्याने जागीच ठार झाली. 

उदगीरला २६ मि.मी. पावसाची नोंद
उदगीर (जि. लातूर) - उदगीर शहर व परिसरामध्ये काल सायंकाळी व मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. उदगीर शहरात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शहरातील एसटी कॉलनीतील देवेंद्र पाटील यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाडाला आग लागली. अग्निशामक दलाच्या पथकाने आग नियंत्रणात आणल्याची माहिती नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांनी दिली. सायंकाळी पावसामुळे बाजारपेठेत धांदल उडाली. मध्यरात्री दोनला पुन्हा वादळी वारे, विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरवात झाली. उदगीर शहरात २६, तर तालुक्‍यातील सात महसूल मंडळांपैकी फक्त देवर्जन मंडळात चार मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे खरात यांनी सांगितले.

देवणीत हलका पाऊस
देवणी - तालुक्‍यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी-वाऱ्यासह नागराळ, पंढरपूर, तळेगाव (भोगेश्वर) आदी भागांत मध्यम स्वरूपाचा, तर अन्य भागांत हलका पाऊस झाला. तालुक्‍यात आजही दिवसभर ढगाळ वातावरण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT