solapur news sakal
महाराष्ट्र बातम्या

रुक्मिणी महोत्सवात अडीच दिवसांतच ५ लाखांची विक्री! पुणे, छत्रपती संभाजीनगर विभागातील बचतगटांनी मानले झेडपी सीईओंसह सोलापूरकरांचे आभार

पुणे व छत्रपती संभाजी नगर विभागातील महिला बचतगटांच्या विविध वस्तूंना सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवातून अवघ्या अडीच दिवसात पाच लाख रुपयांची उलाढाल झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत समारोप पार पडला.

तात्या लांडगे

सोलापूर : पुणे व छत्रपती संभाजी नगर विभागातील महिला बचत गटांच्या विविध वस्तूंना सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवातून अवघ्या दोन ते अडीच दिवसात पाच लाख रुपयांची उलाढाल झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम पार पडला. सोलापूरकरांचा प्रतिसाद पाहून बचतगटांनी पुन्हा एकदा महोत्सव आयोजित करण्याची विनंती केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत रंगभवनजवळील वोरोनोको प्रशालेच्या मैदानात १९ जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवाचे उद्‌घाटन झाले होते. पहिल्याच दिवशी दुपारनंतर रात्री दहापर्यंत एक लाख १६ हजार ४२२ रुपयांची उलाढाल झाली होती.

२० जानेवारीला संपूर्ण दिवसभरात दोन लाख रुपयांची आणि महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २१ जानेवारीला दुपारी एक वाजेपर्यंत दीड लाखांपर्यंत उलाढाल झाली. या महोत्सवात पुणे व छत्रपती संभाजी नगर विभागातून एकूण ६० स्टॉल लावण्यात आले होते. त्यात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, लाकडी व चामडीच्या वस्तू, साड्या, चादरी, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल यासह चवदार खाद्यपदार्थ देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे समन्वयक सचिन चवरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी या महोत्सवासाठी परिश्रम घेतले. नेटक्या नियोजनामुळे व सोलापूरमध्ये संधी दिल्याने सर्वच महिलांनी सीईओ आव्हाळे यांचे आभार मानले. पहिल्या दिवशी सीईओंनी स्वत: काही वस्तूंची खरेदी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेतील इतर अधिकाऱ्यांनीही त्याठिकाणी खरेदी केली.

महिला बचत गटांना पालकमंत्र्यांकडून अपेक्षा

रुक्मिणी महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी कोल्ड स्टोअरेज उभारले जाईल. त्यासाठी एक कोटी सहा लाखांचा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर केल्याचे सांगितले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मेळघाट मार्केटप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या वस्तू खरेदी करून त्यांना चांगले पैसे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण करता येईल, असे स्पष्ट केले होते. त्याकडे जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT