ujani dam sakal
महाराष्ट्र बातम्या

सहा दिवसांत उजनीत वाढले ५ टीएमसी पाणी! धरण आता मायनस २४.८७ टक्के; सोलापूर शहराचे दुबार पंपिंगचे संकट टळले

९ जुलैपर्यंत उजनी मायनस ३६.१९ टक्के होते. त्यामुळे दुबार पंपिंगची स्थिती निर्माण झाली होती. पण, लोणावळा, भीमाशंकर, खडकवासला धरणसाखळीत मुसळधार पाऊस झाल्याने उजनीत मागील सहा दिवसांत पाच टीएमसी पाणी वाढले आहे. त्यामुळे दुबार पंपिंगची चिंता आता दूर झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाळा सुरु होऊनही ९ जुलैपर्यंत उजनी धरण मायनस ३६.१९ टक्के होते. त्यामुळे दुबार पंपिंग सुरु करण्याची स्थिती निर्माण झाली होती. पण, लोणावळा, भीमाशंकर, खडकवासला धरणसाखळीत मुसळधार पाऊस झाल्याने उजनीत मागील सहा दिवसांत पाच टीएमसी पाणी वाढले आहे. त्यामुळे दुबार पंपिंगची चिंता आता दूर झाली आहे.

पुणे, सोलापूर, नगर या जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने तळ गाठला होता. पण, आता धरणातील पाणीसाठा वधारू लागला आहे. त्यातून शेतकऱ्यांसह काही शहरांना (ज्या शहराचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून आहे अशी शहरे) दिलासा मिळाला आहे. मात्र, सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व हिप्परगा तलाव परिसरात अजूनही समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील पेरण्याही अजून २० टक्क्यांवर गेलेल्या नाहीत.

बार्शी, पंढरपूर, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये पेरणी खूपच कमी आहे. त्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरणे ही बाब शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. सध्या धरणात दौंडवरून १८ हजार १८५ क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे. असाच विसर्ग नियमित राहिल्यास २४ तासांत एक टीएमसी पाणी वाढते, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दौंडवरून १८ हजार क्युसेकचा विसर्ग

पावसाळा सुरु होऊन महिना लोटला तरीदेखील धरणाची मायनस पातळी सुधारत नव्हती. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, इंदापूर, बारामती, नगर या शहरातील नागरिकांची चिंता वाढली होती. पण, काही दिवसांपूर्वी लोणावळा, भीमाशंकर घाट माथ्यावर आणि खडकवासला धरण साखळीत चांगला पाऊस झाला. त्यानंतर मागील सहा दिवसांत पुणे जिल्ह्यातून चांगला विसर्ग धरणात आला आणि उजनीची पाणीपातळी सव्वा मीटरने वाढली. त्यामुळे त्या शहरांवरील दुबार पंपिंगचे संकट तुर्तास टळले आहे. सध्या उजनीत १८ हजार १८५ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत आहे.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • पाण्याचा मृतसाठा

  • ५०.२९ टीएमसी

  • जिवंत पाणीसाठा

  • मायनस १३.१८ टीएमसी

  • दौंडवरून येणारा विसर्ग

  • १८,१८५ क्युसेक

  • पाण्याची टक्केवारी

  • मायनस २४.८७ टक्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT