Thane  sakal
महाराष्ट्र बातम्या

लाचखोर कृषी अधिकाऱ्याच्या घरात ६ पोती कांद्याचे बियाणे! 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी घेतली घराची झडती; शेतकऱ्याने दिलेले ८००० रुपये ठेवले फाईलमध्ये

शेतकऱ्याने कृषी अवजारांसाठी केलेल्या अर्जास पूर्व संमती देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्याचा कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय ३१, रा. बाळे) याने आठ हजारांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २६) त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शेतकऱ्याने कृषी अवजारांसाठी केलेल्या अर्जास पूर्व संमती देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्याचा कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय ३१, रा. बाळे) याने आठ हजारांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २६) त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या घराची झडती घेताना तेथे सहा पोती कांद्याचे बियाणे सापडले आहे.

तक्रारदाराने शेतीच्या अवजारासाठी काही महिन्यापूर्वी ऑनलाइन अर्ज केला होता. त्याला पूर्व मंजुरी मिळत नसल्याने त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हेलपाटे मारले. त्यावेळी अर्जास पूर्व मंजुरी तथा संमती देण्यासाठी धनंजय शेटे याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी (ता. २५) लगेचच काही वेळात पैसे आणून दे, असे शेटे तक्रारदारास म्हणाला होता. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी लगेचच सापळा लावला, पण कृषी अधिकारी शेटे याने दुपारनंतर तक्रारदाराचा फोन उचलला नाही. लाचेची रक्कम बुधवारी सकाळी द्यायची ठरले. त्यानुसार तक्रारदार पैसे घेऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी कागदातील पैसे फाईलमध्ये ठेवायला सांगितले.

पैसे ठेवलेले फाइल शेटे याने पंचासमक्ष स्वत:कडे घेऊन ठेवली. त्यावेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश पवार, रवींद्र लांभाते यांच्या नेतृत्वात अंमलदार सलीम मुल्ला, श्रीराम घुगे, स्वामीराव जाधव, राजू पवार, अक्षय श्रीराम या पथकाने पार पाडली. कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली. हा शेटे पाच वर्षांपूर्वीच अधिकारी म्हणून नोकरीला लागला होता.

कांद्याचे बियाणे घरी कसे?

लाच घेणारा धनंजय शेटे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड येथील रहिवासी आहे. त्याला उद्या (गुरुवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या घरात काही दागिने, साहित्य व सहा पोती कांद्याचे बियाणे आढळल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ते बियाणे त्याच्या घरी कसे, याचा तपास अधिकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT