महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : भाजपचा पुन्हा 'विशेष कार्यक्रम'; काँग्रेसचे 6 आमदार गळाला?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपच्या 'विशेष कार्यक्रम'च्या मेसेजने विरोधकांची चांगलीच झोप उडवली असून, आज आलेल्या या मेसेजमुळे विरोधी पक्षांतील नेत्यांची डोकेदुखी पुन्हा सुरू झाली आहे. भाजपने ज्या-ज्या वेळी 'विशेष कार्यक्रम' आयोजित केला. त्या-त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपच्या कळपात सहभागी झाले. यामुळे आता 30 तारखेला भाजपच्या गळाला कोण-कोण लागलंय याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

भाजपचा 'विशेष कार्यक्रम' म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांची भाजपमध्ये 'मेगा भरती' असं समीकरण रूढ झालं आहे. उद्याच्या "विशेष कार्यक्रमा"चे प्रमुख पाहुणे हे काँग्रेसचे सहा आमदार असल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली तरीदेखील काँग्रेसमधील गळती काही केल्या थांबायला तयार नाही. काँग्रेसचे सहा विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. आता हे सहा आमदार उद्या (ता. 30) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसच्या या सहा आमदारांमध्ये मुंबईतील 1,धुळ्यातील 2 आणि सोलापुरातील 2 आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने जरी आपले आमदार जाणार नसल्याचे सांगितले असले तरी भाजपने मात्र उद्या (ता.30) दुपारी 12 वाजता मुंबईच्या गरवारे क्लब येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला असल्याचा निरोप माध्यमांना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा "विशेष कार्यक्रम" संपन्न होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT