Cyber Crime online fraud case.

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरात दररोज ६ जणांची ऑनलाइन फसवणूक! शहर सायबर पोलिसांकडे ५ महिन्यांत ९९३ जणांच्या तक्रारी; आमिषाला भुलले अन्‌ ४.२७ कोटी रुपये घालवले, वाचा...

सोलापूर शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल ९९३ नागरिकांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. यात ८२० जणांची आर्थिक फसवणूक झाली असून, सायबर गुन्हेगारांनी त्यांना तब्बल ४ कोटी २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल ९९३ नागरिकांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. यात ८२० जणांची आर्थिक फसवणूक झाली असून, सायबर गुन्हेगारांनी त्यांना तब्बल ४ कोटी २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या आकडेवारीनुसार शहरात दररोज सरासरी सहा जण ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत.

सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे १ जानेवारी ते ३१ मे २०२६ या कालावधीत एकूण ९९३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी सुमारे ८० टक्के तक्रारी आर्थिक फसवणुकीच्या आहेत. शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष, टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याच्या योजना, इन्स्टंट लोन, शॉर्ट टर्म लोन ॲप्स तसेच वैवाहिक संकेतस्थळे यांद्वारे नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही अनेकांना लक्ष्य करण्यात आले आहे.

दुसऱ्यांचे फोटो व नावे वापरून बनावट खाती तयार करणे, पैशांची मागणी करणे, तसेच अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पाठवून त्रास देण्याच्या १६३ तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केंद्रीय सायबर पोर्टल, महाराष्ट्र सायबर तसेच सोलापूर शहर सायबर पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

सोलापूर शहर ‘सायबर’कडील ५ महिन्यांतील तक्रारी

  • एकूण तक्रारी

  • ९९३

  • फसवणुकीची रक्कम

  • ४.२७ कोटी

  • ‘सायबर’कडून होल्ड रक्कम

  • १,०१,२७,०००

  • तक्रारदारांना परत केलेली रक्कम

  • ५० लाख रुपये

...नाहीतर आयुष्यभराची कमाई होईल लंपास

आपल्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून आलेली लिंक, मेसेज किंवा कॉलवर लगेच विश्वास ठेवू नका. त्याबद्दल खात्री करा, नाहीतर आयुष्याची कमाई एका क्षणात सायबर गुन्हेगार लंपास करू शकतात. सायबर पोलिसांनी वारंवार आवाहन करुनही लोक अनोळखीवर विश्वास ठेवून फसत आहेत. कोणाची फसवणूक झालीच तर काही वेळात त्यांनी १९३० टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवावी.

- डॉ. अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त (गुन्हे), सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT