Coronavirus esakal
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : सोमवारी राज्यात कोरोनाचे नवीन ६१ रुग्ण, २ हजार ७२८ कोविड चाचण्या

राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण आढळले असून ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

संतोष कानडे

मुंबईः राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण आढळले असून ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.१७ टक्के इतकं आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे.

सोमवारी राज्यामध्ये कोरोनाच्या २ हजार ७२८ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्या १ हजार ४२३ इतक्या झाल्या तर आरएटी चाचण्या १ हजार ३०५ झाल्या. राज्यात सोमवारचा पॉझिटिव्हीटी दर २.२३ टक्के इतका आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहतीनुसार, सध्या राज्यामध्ये जेएन.१ व्हेरिएंटचे २५० रुग्ण आहेत. यामध्ये पुण्यात सर्वाधिक १५० रुग्ण आहेत. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली आणि ठाणे प्रत्येकी ७ रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यात कमी प्रमाणात रुग्णसंख्या आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत १४१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ७०.९२ टक्के रुग्ण साठ वर्षांवरील आहेत. तर ८४ टक्के रुग्ण सहव्याधी, १६ टक्के रुग्ण सहव्याधी नसलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT