College-Admission 
महाराष्ट्र बातम्या

पुण्यात अकरावीच्या ६१,५०० जागा रिक्त; तर राज्यात एवढ्या जागा

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या पहिल्या तीन नियमित फेऱ्यांमध्ये दोन लाख ३८ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, तीन लाख २० हजार २६ जागा रिक्त आहेत. पुण्यात ६१ हजार ५८५, तर मुंबईमध्ये एक लाख ८४ हजार ९६० जागा रिक्त आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी पहिल्या विशेष फेरीची निवड यादी गुरुवारी (ता. २४) जाहीर केली जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये निवड यादीत नाव लागूनही अनेकांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलून अर्ज लॉक करणे अनिवार्य करण्यात आले. यंदा विशेष फेरीत रिक्त जागांची संख्या तुलनेने अधिक आहे.

शहरातील नामांकित महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळावा, या अपेक्षेने विद्यार्थी पुढील फेरीसाठी प्रतीक्षा करतात.  काही विद्यार्थी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज भरून प्रत्यक्ष शहराबाहेरील महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन प्रवेश घेत असावेत. त्याशिवाय, आयटीआय आणि अन्य पदविका अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्न करत असतील. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन प्रक्रियेअंतर्गत प्रवेशात सहभागी होत नसावेत. प्रवेशासाठी असणाऱ्या एकूण जागा आणि आलेले अर्ज पाहता, प्रवेशाच्या जागा अधिक असल्याचे दिसून येते. 
- मीना शेंडकर, सचिव, इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समिती

बाहेरगावाहून अकरावीसाठी पुण्यात येणारे विद्यार्थी प्रवेश फेरीदरम्यान निवड यादीत नाव लागूनही प्रवेश घेत नसल्याचे दिसून येते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालक विद्यार्थ्यांना पुण्यात पाठविण्याबाबत द्विधा मनःस्थितीत आहेत. तसेच, पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळावे, म्हणून अनेक विद्यार्थी पुढील फेरीच्या प्रतीक्षेत आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी प्रवेशाबाबत फोनद्वारे संपर्क साधला जात आहे, त्यातून ही माहिती समोर येत आहे.
- विनायक सोलापूरकर, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT