महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात त्यांच्या संघटनेसोबत झालेल्या चर्चेवेळी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वर्षे करणे, मानधनात वाढ करणे याबाबतचा शासननिर्णय २३ फेब्रुवारी २०१८ रोजी काढण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे ठेवण्याबाबत विधानमंडळाच्या मार्च-२०१८ च्या अधिवेशनात सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार सेविकांचे सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहास देण्यात आले होते. त्यानुसार आजचा निर्णय घेण्यात आला.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्‍यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमधील पहिल्या अटीत बदल करण्यात आला असून, त्यानुसार धरण पायथा जलविद्युतगृह उभारणी रद्द करून त्याऐवजी धरणातील पाण्याचा प्रवाही सिंचनासाठी वापर करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. 

राज्यातील मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापन हे शब्द समाविष्ट करून या विभागाचे नाव आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, असे करण्यास मान्यता देण्यात आली.

चंद्रपूरमधील दारूबंदी कायम
चंद्रपूरमधील दारूबंदी ५८८ ग्रामपंचायतींनी ठराव केल्यामुळे झाली होती. त्यामुळे चंद्रपूरमधील दारूबंदी उठविण्याची मागणी करणे योग्य नसल्याचा प्रतिवाद अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसल्याचा दावाही मुनगंटीवार यांनी मंगळवारी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT