700 people poisoned at NCP leader son wedding Aurangabad
700 people poisoned at NCP leader son wedding Aurangabad  
महाराष्ट्र

NCP: धक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (700 people poisoned at NCP leader son wedding Aurangabad )

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कदिर मौलाना (Abdul Qadeer Moulana) यांच्या मुलाचा काल लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात पाहुण्यांना जेवणानंतर काही वेळातच उलट्या व मळमळीचा त्रास झाल्याने त्यांना परिसरातील एमजीएम व घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह बुधवार, 4 जानेवारी रोजी पार पडला. विवाह पार पडल्यानंतर रात्री पाहुण्यासाठी मेजवानी देण्यात आली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले.

हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळी चा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतःहून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र याचे प्रमाण वाढताच हे मेजवानतील जेवणातून झाल्याचे समोर आले.

..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

या विष बाधित महिला लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT