7/12 esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! 7/12 उताऱ्यावरील ‘नवीन शर्त’चा शेरा कमी करण्यास परवानगी; उताऱ्यावरील ‘वर्ग-२’चा शेराही होणार कमी; प्रकल्पग्रस्तांना कधीही विकता येईल जमीन

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या सातबारावरील नवीन शर्त हा शेरा आता कमी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, करमाळा व माढा तालुक्यात विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत. त्यात जमीन वाटप करून दहा वर्षे झालेल्या सातबारा उताऱ्यावरील शेरा तहसीलदारांमार्फत हटविला जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या सातबारावरील नवीन शर्त हा शेरा आता कमी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, करमाळा व माढा तालुक्यात विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत. त्यात जमीन वाटप करून दहा वर्षे झालेल्या सातबारा उताऱ्यावरील शेरा तहसीलदारांमार्फत हटविला जाणार आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या बहुतेक सातबारा उताऱ्यावर नवीन शर्त हा शेरा असल्याने त्यांना जमिनीची खरेदी-विक्री करण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे काहींच्या इतर हक्कात हा शेरा नोंदविलेला आहे. संबंधित शेतकऱ्याने कब्जा वहिवाटीची रक्कम भरल्याची खात्री करून तहसीलदार त्या प्रकल्पग्रस्तांच्या उताऱ्यावरील तो शेरा हटविणार आहेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावा लागेल. दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांची ‘वर्ग- एक’ची जमीन प्रकल्पात गेलेली असताना देखील अनेकांना ‘वर्ग-दोन’च्या जमिनी देण्यात आल्या आहेत. त्या प्रकल्प बाधितांना देखील आता तहसीलदारांकडे अर्ज करून ‘वर्ग-दोन’चा शेरा बदलून तो ‘वर्ग-एक’ करून घेता येणार आहे.

याशिवाय ज्यांची ‘वर्ग-दोन’ची जमीन जाऊन त्यांना तशीच जमीन मिळाली असेल तर त्यांना देखील तो शेरा बदलून घेता येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आता त्यावरील कार्यवाही संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयातूनच होणार आहे. दरम्यान, ज्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळालेल्या नाहीत. त्यावरील निर्णय देखील आगामी काळात होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांसाठी तहसील स्तरावर विशेष मोहीम

प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नवीन शर्त शेरा कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या प्रकल्प बाधितांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांकडे अर्ज करून तो शेरा कमी करून घ्यावा. जमीन वाटप होऊन दहा वर्षे झालेल्यांना या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळेल. त्यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्प घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

- सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), सोलापूर

प्रकल्पग्रस्तांना जमीन विकण्यास परवानगी

पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अन्य तालुक्यांमध्ये पर्यायी जमिनी देण्यात आल्या. त्यावेळी शासनाने पुनर्वसित शेतकऱ्यांना जमीन विकण्यासाठी दहा वर्षांचे बंधन घातले होते. हा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय त्यांना जमीन विकता येत नव्हती. पण, आता हे निर्बंध हटविण्यात आले असून प्रकल्पग्रस्तांना कधीही त्यांच्या सोयीने पुनर्वसनाची जमीन विकता येते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Vijay Thalapathy Jan Gan Man: विजय थलपतींचा धाडसी निर्णय, तब्बल २५ वर्षांचा नियम मोडला; तामिळ विधानसभेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत गायले

Petrol-Diesel-CNG Price: 23 जून रोजी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

Tawade Hotel Area Action : तावडे हॉटेल परिसरात 23 बांधकामे तोडली; महापालिकेची धडक कारवाई, अतिक्रमित झालेली 2900 चौरस मीटर जागा खुली

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

Pitreshwar Hanuman Dham: देशातील अनोखी हनुमान मूर्ती पाहिलीत का? इंदूरच्या पितरेश्वर धामात ध्यानमग्न अवस्थेतील बजरंगबलीचा भव्य अवतार

SCROLL FOR NEXT