ambulance  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ambulance Help : राज्यात तब्बल ८० लाख जणांना रुग्णवाहिकेची मदत

आठ वर्षांत राज्यात तब्बल ८० लाख ४४ हजार जणांना वेळेत रुग्णालयात पोचवून रुग्णांना जीवदानासह आधार दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

आठ वर्षांत राज्यात तब्बल ८० लाख ४४ हजार जणांना वेळेत रुग्णालयात पोचवून रुग्णांना जीवदानासह आधार दिला आहे.

- सचिन शिंदे

कऱ्हाड - शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव धोक्यात आल्यास १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला जातो. त्या रुग्णवाहिकेमुळे संबंधित व्यक्तीलाही जीवदान मिळते. सुमारे आठ वर्षांपासून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपघातासह आपत्कालीन परिस्थितीत जलद वैद्यकीय सेवा उपलब्धतेसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू आहे. आठ वर्षांत राज्यात तब्बल ८० लाख ४४ हजार जणांना वेळेत रुग्णालयात पोचवून रुग्णांना जीवदानासह आधार दिला आहे. कोरोना, पूरस्थिती, महाकुंभ मेळावा, पालखी सोहळ्यासह गणेशोत्सावातही राज्यभरात ९३७ रुग्णवाहिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

२०१४ पासून रुग्णवाहिकेची नागरिकांसाठी मोफत सेवा उपलब्ध करून दिली. नियमित स्थितीसह आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना रुग्णवाहिकेचा मोठा आधार झाला. त्वरित वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने ती योजना खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झाली आहे. रुग्णवाहिकेमुळे आठ वर्षांत राज्यातील १४ लाख ४० हजार महिलांची प्रसूती सुखरूपपणे पार पडले आहे. कोरोना स्थितीतही चांगले काम केले आहे.

पूरस्थितीत थेट पूरग्रस्तांना वैद्यकीय सेवा देण्यात रुग्णवाहिकेच्या पुढे होती. रुग्णवाहिकेने २०१४ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुमारे चार लाख ८० हजार ६४० अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यातील बहुतांशी जणांना जीवदान देण्याचे काम रुग्णवाहिकेने शक्य झाले. १३ वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले. त्यात अपघात, नैसर्गिक आपत्ती, जळणे, प्रसूती, सार्वजनिक आपत्ती यासारख्या सेवा देण्यात रुग्णवाहिका आघाडीवर आहे.

उत्सवातही हातभार

  • महाकुंभ मेळाव्यात एक लाख सात हजार २०० जणांना मदत

  • पंढरपूरच्या वेगवेगळ्या वारीतील २ लाख ६६ हजार नागरिकांना मदत

  • गणेशोत्सवात तीन हजार ८४५ नागरिकांना मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : सबरीमाला प्रकरण: एसआयटीने माजी टीडीबी अध्यक्ष पद्मकुमार यांना केली अटक

SCROLL FOR NEXT