sugar factories sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आजअखेर ८६१ लाख टन उसाचे गाळप

राज्यातील साखर कारखान्यांनी आजअखेर ८६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे शंभर लाख मेट्रिक टनांनी अधिक आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील साखर कारखान्यांनी आजअखेर ८६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे शंभर लाख मेट्रिक टनांनी अधिक आहे.

पुणे - राज्यातील (Maharashtra) साखर कारखान्यांनी (Sugar Factory) आजअखेर ८६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप (Sugarcane Crushed) केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे शंभर लाख मेट्रिक टनांनी अधिक आहे. तर, साखरेच्या उत्पादनातही (Sugar Production) तुलनेत १०६ लाख क्विंटलनी वाढ झाली आहे. सध्या साखर कारखान्यांकडून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येत असला तरी साखरेच्या उताऱ्याचे प्रमाणही साधारण गतवर्षीएवढे आहे.

साखर आयुक्तालयाकडून १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील गाळप हंगामाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार राज्यात सध्या ९८ सहकारी आणि ९९ खासगी अशा एकूण १९७ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी १७ फेब्रुवारीअखेर ८६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गेल्या हंगामात ७६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा साखरेचे उत्पादन ८७९ लाख क्विंटल झाले आहे. मागील हंगामात या तारखेस ७७४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. तसेच, साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १०.२१ टक्के असून, गेल्या हंगामात हे प्रमाण १०.१७ टक्के इतके होते, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.

हंगामअखेर साखर उत्पादन ११२ लाख टनांपर्यंत

राज्यात २०२०-२१ च्या मागील हंगामात १ हजार १४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. तर, १०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा २०२१-२२ च्या हंगामात एकूण १ हजार ९६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणे अपेक्षित असून, साखरेचे उत्पादन ११२ लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज साखर आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विभागनिहाय गाळप हंगाम २०२१-२२ (१७ फेब्रुवारीअखेर)

विभाग ऊस गाळप (लाख मे.टन) साखर उत्पादन (लाख क्विंटल) साखर उतारा

कोल्हापूर २०२.९२ २३६.२९ ११.६४

पुणे १७३.५१ १८०.१२ १०.३८

सोलापूर २०३.४८ १८६.९४ ९.१९

नगर ११६.१३ ११२.४३ ९.६८

औरंगाबाद ७१.५५ ६८.७२ ९.६०

नांदेड ८३.६३ ८५.८४ १०.२६

अमरावती ६.२१ ५.७२ ९.२१

नागपूर ३.५५ ३.०४ ८.५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT