solapur district sakal
महाराष्ट्र बातम्या

स्वातंत्र्यानंतर सोलापुरात आले 9 पंतप्रधान! नरेंद्र मोदी 10 वर्षांत पाचव्यांदा सोलापुरात! तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त येणारे मोदी पहिलेच पंतप्रधान

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर सोलापूर जिल्ह्यात 9 पंतप्रधान येऊन गेले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच सहावेळा येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिलेच आहेत. 2014, 2019, 2024 या तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त ते सोलापुरात आले आहेत हे विशेष.

तात्या लांडगे

सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर सोलापूर जिल्ह्यात एकूण नऊ पंतप्रधान येऊन गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच सहावेळा येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिलेच आहेत. २०१४, २०१९ आणि आता २०२४ या तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त ते सोलापुरात आले आहेत हे विशेष.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा पक्षाकडून झाली आणि त्यांनी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी सोलापुरात देखील जाहीर सभा घेतली आणि मोदी लाटेत भाजपचे उमेदवार ॲड. शरद बनसोडे यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी रे नगरसह विविध विकासकामांच्या लोकापर्णासाठी सोलापुरात सभा घेतली होती. त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत झाला आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माढा व सोलापूर येथील त्यांचे दोन्ही उमेदवार विजयी ठरले.

पुढे विधानसभा निवडणुकीत आमदारांमध्येही वाढ झाली. आता २०२४च्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मात्र, २०१४ व २०१९ च्या तुलनेत सद्य:स्थिती वेगळी आहे, तरीपण या निवडणुकीचा निकाल काय असणार हे ४ जूनलाच समोर येणार आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत एकाच मतदारसंघात सहावेळा येऊन सभा घेणारे नरेंद्र मोदी सोलापूरकरांसाठी पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधान मोदींचे सोलापूर दौरे अन्‌ सभा

  • ९ एप्रिल २०१४ : होम मैदानावर सभा

  • ९ जानेवारी २०१९ : पार्क स्टेडिअमवर सभा

  • १७ एप्रिल २०१९ : अकलूज येथे जाहीर सभा

  • १९ जानेवारी २०२४ : रे नगर येथे सभा

  • २९ एप्रिल २०२४ : होम मैदानावर सभा

  • ३० एप्रिल २०२४ : माळशिरस येथे सभा

आजवर सोलापुरात आले ९ पंतप्रधान

निवडणुकीच्या प्रचारानिमित्त दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी या काँग्रेसच्या प्रचारानिमित्त त्यावेळी सोलापुरात आल्या होत्या. त्यांनतर पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनीही प्रचाराच्या निमित्ताने सोलापुरात सभा घेतली होती. तसेच पंतप्रधान व्ही.पी. सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांच्याही सोलापुरात सभा पार पडल्या आहेत. त्यांच्या सभा होम मैदानावरच झाल्या होत्या. याशिवाय मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी हे सुद्धा सोलापुरात आले होते, पण त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते. तत्पूर्वी, पंडीत नेहरू १९६० मध्ये सोलापुरात आले होते. मनमोहन सिंग हे देखील १ सप्टेंबर २००६ रोजी सोलापुरात आले होते, पण प्रचारासाठी नव्हे तर गोदुताई परूळेकर गृहनिर्माण वसाहतीतील १० हजार घरांच्या लोकापर्णासाठी आले होते, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT