mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

92 लाख बहिणींच्या खात्यात आज, उद्या रक्कम! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज? विधानसभेला महायुतीचा ‘या’ जिल्ह्यांवर सर्वाधिक फोकस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शनिवार शेवटची मुदत असून आतापर्यंत दोन कोटी २६ लाख सात हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केले आहेत. एक कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रूपये वितरीत केले असून ९२ लाख महिलांना आज, उद्या लाभ मिळणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची उद्या (शनिवार) शेवटची मुदत असून आतापर्यंत राज्यातील दोन कोटी २६ लाख सात हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केले आहेत. त्यातील एक कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रूपये वितरीत केले असून आणखी ९२ लाख महिलांना गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच आगामी दोन-तीन दिवसांत लाभ मिळेल, असे सांगण्यात आले.

राज्यातील महायुती सरकारला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातूनच पुन्हा सत्ता मिळू शकते, असा अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे सुरवातीला योजनेतून अर्ज करताना लागू केलेले नियम व अटी पुन्हा चारवेळा शासन निर्णय बदलून शिथिलता करण्यात आल्या.

भंडारा, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, मुंबई शहर, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा व वाशिम या ११ जिल्ह्यांमधून दोन ते चार लाखांच्या आतच अर्ज आहेत. या पार्श्वभूमीवर कमी अर्ज प्राप्त जिल्ह्यांच्या तुलनेत पाच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त २५ जिल्ह्यांवर महायुतीकडून सर्वाधिक फोकस केला जात आहे. या प्रत्येक महिलांची मोबाइल क्रमांकासहित माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ‘योजना दूत’ व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या घरोघरी जावून विधानसभेचा प्रचार केला जावू शकतो.

योजनेची सद्य:स्थिती

  • एकूण अर्ज

  • २,२६,०६,९१७

  • लाभ मिळालेल्या बहिणी

  • १.३४ कोटी

  • आतापर्यंत रक्कम वितरीत

  • ४,०२० कोटी

  • लाभाच्या प्रतीक्षेतील महिला

  • ९२ लाख

महायुतीचे ‘या’ १६ जिल्ह्यांवर विशेष लक्ष?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी २६ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज पुणे (१६.९५ लाख), नाशिक (१३.०७ लाख), मुंबई (११.८४ लाख), नगर (१०.८७ लाख), नागपूर (९.६५ लाख), सोलापूर (९.६५ लाख), कोल्हापूर (९.४४ लाख), जळगाव (८.९८ लाख), छत्रपती संभाजीनगर (८.७३ लाख) यासह अमरावती, बीड, बुलढाणा, नांदेड, सांगली, सातारा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सहा ते साडेसात लाखांपर्यंत अर्ज भरले गेले आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत अडचणी

केंद्राच्या उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलेला (प्रति कुटुंब एक) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मात्र, बहुतेक गॅस कनेक्शन कुटुंबातील पुरूषांच्याच नावे आहेत. त्यामुळे मोफत गॅस सिलिंडर अनेकांना मिळणार नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT