Police Transfers : राज्यातील आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील ‘या’ ९६ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सोलापूर झेडपी सीईओंच्या पत्नी वृष्टी जैन, ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक यावलकर शहरात उपायुक्त; कबाडे अपर पोलिस अधीक्षक

राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी ९६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची बदली सोलापूर शहरात उपायुक्तपदी झाली आहे. तर पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांची बदली ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षकपदी झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम, तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या गृह विभागाने आज (शुक्रवारी) ९६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची बदली सोलापूर शहरात उपायुक्तपदी झाली आहे. तर पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांची बदली ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षकपदी झाली आहे.

सोलापूर शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून विजय कबाडे यांनी जून २०२४ मध्ये पदभार स्वीकारला होता. दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली नागपूरला झाली होती, पण त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. जून २०२६ मध्ये त्यांची ही मुदत संपली होती. गृह विभागाच्या बदल्यांमध्ये त्यांना सोलापूर ग्रामीण पोलिस दलात अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी बार्शी विभागात उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

अक्कलकोट विभागात उपअधीक्षक म्हणून काम केलेले प्रीतम यावलकर यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. त्यांचा कार्यकाळ यापूर्वीच पूर्ण झाला होता. आता त्यांची बदली सोलापूर शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून झाली आहे.

झेडपी सीईओंची पत्नी वृष्टी जैन सोलापूर शहरात पोलिस उपायुक्त

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या पत्नी वृष्टी जैन या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या त्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची बदली आता सोलापूर शहरात पोलिस उपायुक्त म्हणून झाली आहे. दुसरीकडे, शहरातील पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या पत्नी शफकत आमना या धाराशिव येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची बदली गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी झाली आहे. हसन यांनीही बदलीसाठी विनंती केली होती. त्यानुसार त्यांचीही बदली पुणे शहर पोलिसांत उपायुक्त म्हणून झाली आहे.

‘या’ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • जीवन देवाशिष बेनिवाल : उपायुक्त (पुणे शहर)

  • शुभम कुमार : अपर पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण)

  • वृष्टी जैन : उपायुक्त (सोलापूर शहर)

  • हर्षवर्धन : अपर पोलिस अधीक्षक (गडचिरोली)

  • कृष्ण प्रकाश : अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण)

  • दत्ता कराळे : विशेष पोलिस महानिरीक्षक (नाशिक)

  • प्रविण पडवळ : विशेष पोलिस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र)

  • लखमी गौतम : विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

  • मनोज शर्मा : पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई)

  • सुवेझ हक : पोलिस सहआयुक्त (प्रशासन, मुंबई)

  • महेश पाटील : विशेष पोलिस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

  • परमजीत दाहिया : विशेष पोलिस महानिरीक्षक (दहशतवादविरोधी पथक)

  • सी. मे. मीना : विशेष पोलिस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र)

  • संजय दराडे : पोलिस सहआयुक्त (पुणे)

  • रंजन शर्मा : विशेष पोलिस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र)

  • सुनील फुलारी : विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, पूर्व)

  • राजेश प्रधान : पोलिस सहआयुक्त (आर्थिक गुन्हे, मुंबई)

  • निशिथ मिश्रा : विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण)

  • जय कुमार : विशेष पोलिस महानिरीक्षक (फोर्स वन)

  • संजय येनपुरे : विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा)

  • संजय जाधव : अपर पोलिस आयुक्त (ठाणे)

  • दिपक साकोरे : पोलिस सहआयुक्त (नवी मुंबई)

  • पंजाबराव उगले : विशेष पोलिस महानिरीक्षक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ)

  • एस. व्ही. पाठक : विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

  • विनायक देशमुख : नियंत्रक, वैधमापन

  • ज्योती प्रिया सिंग : विशेष पोलिस महानिरीक्षक (अंमली पदार्थविरोधी पथक)

  • अनिल कुंभारे : पोलिस सहआयुक्त (गुन्हे, मुंबई)

  • सत्य नारायण चौधरी : पोलिस सहआयुक्त (वाहतूक, मुंबई)

  • मोक्षदा पाटील : अपर पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई)

  • प्रियंका नारनवरे : पोलिस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई)

  • तेजस्वी सातपुते : अपर पोलिस आयुक्त (गुन्हे, पुणे शहर)

  • अशोक दुधे : पोलिस उपमहानिरीक्षक (राज्य राखीव पोलिस बल, मुंबई)

  • दिक्षीत गेडाम : अपर पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई)

  • कृष्णकांत उपाध्याय : अपर पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई)

  • प्रविण मुंढे : अपर पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई)

  • योगेश गुप्ता : पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली)

  • राकेश ओला : पोलिस उपायुक्त (अमरावती)

  • एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी : पोलिस उपमहानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

  • नंदकुमार ठाकुर : उपसंचालक (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)

  • पी. आर. पाटील : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)

  • जयंत मीना : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • लोहित मतानी : पोलिस अधीक्षक (महामार्ग सुरक्षा, नागपूर)

  • संजय बारकुंड : समादेशक (राज्य राखीव पोलिस बल क्र. ३, जालना)

  • प्रशांत मोहिते : पोलिस उपायुक्त (छत्रपती संभाजी नगर शहर)

  • आदित्य मिरखेलकर : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)

  • गौहर हसन : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)

  • शफकत आमना : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

  • नित्यानंद झा : पोलिस अधीक्षक (यवतमाळ)

  • अभयसिंह देशमुख : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • कुमार चिंता : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)

  • अन्नपुर्णा सिंह : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)

  • एम. किरितिका : प्राचार्य (गुन्हे दोषसिद्धी प्रशिक्षण विद्यालय, नाशिक)

  • विजय खरात : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)

  • विशाल गायकवाड : अपर पोलिस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे शहर)

  • गणेश शिंदे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • दिशेन बारी : पोलिस अधीक्षक (दहशतवादविरोधी पथक, मुंबई)

  • उज्ज्वला वानकर : राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई)

  • संदीप जाधव : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक शहर)

  • यशवंत सोळंखे : अपर पोलिस अधीक्षक (अंमलीपदार्थ विरोधी पथक, नागपूर)

  • अनिता पाटील : नागरी हक्क संरक्षण (अमरावती)

  • पंकज डहाणे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • पल्लवी बर्गे : पोलिस अधीक्षक (पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे)

  • स्वाती भोर : समादेशक राज्य राखीव पोलिस बल क्र. १२ (हिंगोली)

  • संभाजी कदम : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

  • अकबर पठाण : महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक)

  • महेश चिमटे : महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक)

  • कविता नेरकर : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • संजय सरगौंडा पाटील : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)

  • मितेश घट्टे : पोलिस अधीक्षक (फोर्स वन)

  • सुहास बावचे : सहायक पोलिस महानिरीक्षक (दक्षता)

  • पुर्णिमा चौगुले : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • तानाजी चिखले : डायल ११२, नवी मुंबई

  • धीरज पाटील : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)

  • विशाल ठाकुर : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)

  • सचिन पांडकर : अपर पोलिस अधीक्षक (धाराशिव)

  • हिम्मत जाधव : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • दिपक गिऱ्हे : पोलिस उपायुक्त (अमरावती शहर)

  • रमेश चोपडे : (उपायुक्त सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग)

  • विजय कबाडे : अपर पोलिस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण)

  • चंद्रकांत गवळी : पोलिस उपायुक्त (नाशिक शहर)

  • विक्रम साळी : अपर पोलिस अधीक्षक (जालना)

  • रोहिदास पवार : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)

  • योगेश चव्हाण : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)

  • राहुल खाडे : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)

  • सचिन गोरे : एक वर्ष मुदतवाढ (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर)

  • शिवाजी पवार : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

  • अशोक नखाते : अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव, जळगाव)

  • वैशाली शिंदे : उपायुक्त (विशेष सुरक्षा पथक, राज्य गुप्तवार्ता विभाग)

  • प्रितम यावलकर : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)

  • तिरुपती काकडे : (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, रायगड)

  • राहुल मदने : एक वर्षमुदतवाढ (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर)

  • प्रिती टिपरे : पोलिस उपायुक्त (मिरा- भाईंदर, वसई-विरार)

  • प्रशांत अमृतकर : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)

  • प्रशांत स्वामी : अपर पोलिस अधीक्षक (छत्रपती संभाजी नगर)

  • आरती बनसोडे : समादेशक (राज्य राखीव पोलिस बल क्र. ७)

  • विक्रम देशमुख : पोलिस उपायुक्त (मिरा- भाईंदर, वसई-विरार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT