98th Marathi Sahitya Sammelan Delhi Esakal
महाराष्ट्र बातम्या

98th Marathi Sahitya Sammelan: राजधानीत पुन्हा घुमणार मराठी आवाज! तब्बल सात दशकांनी मराठी साहित्य संमेलन दिल्लीत

Marathi Sahitya Sammelan Delhi: आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार. मुंबईत आज झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.

आशुतोष मसगौंडे

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार. मुंबईत आज झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान तब्बल सात दशकांनी प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. याचे आयोजन 'सरहद' या संस्थेकडू करण्यात येणार आहे. 'सरहद'ने 2014 मध्ये पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते.

हे संमेलन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. तर संमेलनाचे हे तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील यासारख्या ठिकाणीच आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

दरम्यान आगामी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी सात ठिकाणाहून प्रस्ताव आले होते. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर संमेलनाच्या स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आगामी साहित्य संमेलन दिल्लीत आयोजीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT