robbery Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात ७८ वर्षीय वृद्धेची फसवणूक! ‘आमच्या साहेबाला ५ मुलीनंतर मुलगा झालाय, त्यामुळे मोफत साड्या वाटप सुरू आहे’ सांगून दुचाकीस्वार दागिने घेऊन पसार

सोलापूर शहरातील सोमवार पेठेतील ७८ वर्षीय महिला विजापूर वेस परिसरात बसली होती. एक दुचाकीस्वार त्या ज्येष्ठ महिलेजवळ आला आणि तो ‘आमच्या साहेबाला चार-पाच मुलींनंतर मुलगा झाला आहे, त्याच्या खुशीत साहेब मोफत साड्या वाटत आहेत’ असे म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून ती महिला दुचाकीवर बसून गेली आणि पुढे त्याने महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. गोदावरील चंद्रशेखर रायचूरकर असे त्या महिलेचे नाव आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील सोमवार पेठेतील ७८ वर्षीय महिला विजापूर वेस परिसरात बसली होती. एक दुचाकीस्वार त्या ज्येष्ठ महिलेजवळ आला आणि तो ‘आमच्या साहेबाला चार-पाच मुलींनंतर मुलगा झाला आहे, त्याच्या खुशीत साहेब मोफत साड्या वाटत आहेत’ असे म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून ती महिला दुचाकीवर बसून गेली आणि पुढे त्याने महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. गोदावरील चंद्रशेखर रायचूरकर असे त्या महिलेचे नाव आहे.

देवदर्शनासाठी पायी जाणाऱ्या ६१ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र व सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली होती. तो संशयित आरोपी हैदराबाद येथील असून त्याच्याविरूद्ध छत्रपती संभाजी नगर, नागपूर शहरात अशाच गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचा शोध सुरू असतानाच आता गुरुवारी (ता. २०) जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ महिलेचे एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली.

गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्या ज्येष्ठ महिलेला हेरून एका दुचाकीस्वाराने साड्या वाटप सुरू असल्याचे सांगून विजापूर वेसजवळील एका गल्लीत नेले. त्याठिकाणी दुसरा एकजण आला. त्यांनी ‘साड्या वाटप आहे, पण गळ्यात काळे मणी असलेले मंगळसूत्र चालणार नाही’ असे सांगून महिलेचे दागिने काढून एका पिशवीत ठेवायला सांगितले. त्यांनी हातचलाखी करून ते मंगळसूत्र लंपास करून दोघेही पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वातील पथक चोरट्यांचा शोध घेत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांचे आवाहन

सोलापूर शहरात परराज्यातील काहीजण दुचाकीवरून येऊन ज्येष्ठ नागरिक विशेषत: ज्येष्ठ महिलांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करीत आहेत. जोडभावी पेठ पोलिस ठाण्यानंतर गुरुवारी (ता. २०) जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. हेल्मेट घालून, तोंडाला मास्क लावून असे दुचाकीस्वार शहरात फिरत आहेत. ज्येष्ठ महिलांना शासकीय योजनांचे पैसे मिळणार आहेत, साडी मिळणार आहे, असे काहीही आमिष दाखवून त्यांच्याकडील दागिने काढून ठेवायला सांगतात. त्यानंतर हातचलाखी करून ते दुचाकीस्वार दागिने लंपास करून पसार होतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT