solapur siddheshwar temple

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात दहशतवादी शिरल्याचा अनोळखी क्रमांकावरून आला कॉल! पोलिस अलर्ट, ७ व्या मिनिटाला शस्रधारी पोलिस मंदिरात, अन्‌...

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शस्त्रधारी पोलिस मंदिर परिसर पिंजून काढत होते. दोघांना शस्त्राच्या निशाणीवर घेऊन बाहेर आणले. भाविकांमध्ये घबराट पसरली होती. सुमारे ४५ मिनिटे हा प्रकार सुरु होता. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मॉकड्रिल सुरु असल्याचे काही मिनिटांनंतर उपस्थित भाविकांना सांगण्यात आले. त्यावेळी सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेला गुरुवारपासून सुरवात होत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज (बुधवारी) पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोलापूर शहर पोलिसांचे मॉकड्रिल पार पडले.

सोलापूर शहर पोलिसांच्या कंट्रोल रुमला अनोळखी व्यक्तीचा ‘डायल ११२’ वरून कॉल आला. श्री सिद्धेश्वर मंदिरात दहशतवादी शिरल्याचे सांगून समोरील व्यक्तीने कॉल ठेवून दिला. त्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत दंगा नियंत्रण पथकाचे अंमलदार (आरसीपी), जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) देखील हाती शस्त्र घेऊन आले होते. परिसरातील भाविकांना काहीच समजेना. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवित एकामागून एक गाडी येत होती. रुग्णवाहिका देखील त्याठिकाणी दाखल झाली.

यावेळी पोलिस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, दिलीप पवार, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, संगीता पाटील आदी अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

...अन्‌ भाविकांना सुटकेचा नि:श्वास सोडला

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शस्त्रधारी पोलिस मंदिर परिसर पिंजून काढत होते. दोघांना शस्त्राच्या निशाणीवर घेऊन बाहेर आणले. भाविकांमध्ये घबराट पसरली होती. सुमारे ४५ मिनिटे हा प्रकार सुरु होता. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मॉकड्रिल सुरु असल्याचे काही मिनिटांनंतर उपस्थित भाविकांना सांगण्यात आले. त्यावेळी सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT