solapur maharashtra
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या संपर्क कार्यालयात शिरली कार; घटना सीसीटीव्हीत कैद, संशयित पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयाच्या गेटला धडक देऊन एक जुनी ॲम्बेसेडर कार गुरुवारी (ता. २०) रात्री आठच्या सुमारास आतमध्ये शिरली. त्यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी तातडीने सदर बझार पोलिस व आरसीबीचे पथक त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयाच्या गेटला धडक देऊन एक जुनी ॲम्बेसेडर कार गुरुवारी (ता. २०) रात्री आठच्या सुमारास आतमध्ये शिरली. त्यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी तातडीने सदर बझार पोलिस व आरसीबीचे पथक त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

सात रस्ता परिसरातील हुमा मेडिकलकडे जाणाऱ्या रोडवर मनीष काळजे यांचे संपर्क कार्यालय आहे. रात्री आठच्या सुमारास अचानकपणे एक जुनी ॲम्बेसेडर कार (एमएच ०१ झेडए ०४२४) लष्करकडे जाणाऱ्या रोडवरून काळजे यांच्या संपर्क कार्यालयाच्या दिशेने आत शिरली. कार्यालयासमोरील लोखंडी गेटला धडक देऊन कार आतमध्ये आली. काही वेळातच पोलिसांना याची खबर लागताच सदर बझार पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी आरसीबीचे पथक देखील बोलावले होते. आता कार कोणाची आहे, रस्ता सोडून त्या संपर्क कार्यालयाच्या गेटला कशी धडकली, याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी पडताळले. पोलिस निरीक्षक श्री. ढवळे यांच्यासह सदर बझार पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार त्याठिकाणी होते. पोलिस तपास करीत आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद

सात रस्त्याकडून लष्करकडे जाणाऱ्या रोडवरून जाणारी ॲम्बेसेडर कार शिवसेना जिल्हाप्रमुख काळजे यांच्या कार्यालयासमोर आली. विरूद्ध दिशेला थोडावेळ थांबल्यावर कारचालक काळजे यांच्या संपर्क कार्यालयाच्या दिशेने थेट निघाला. रस्त्यावरून दुचाकी जात असल्याने कार थोडी स्लो केली आणि पुन्हा जोरात लोखंडी गेटला धडक दिली व कार आत आणली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

SCROLL FOR NEXT