mumbai crime news esakal
महाराष्ट्र बातम्या

''वेश्यागृहातील ग्राहकाला अटक करता येणार नाही!'' उच्च न्यायालयाचा निर्वाळा, नेमकं प्रकरण काय होतं?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वेश्यागृहावर टाकलेल्या छाप्यात नेहरूनगर पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी अटक केलेल्या एका ग्राहकाला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वेश्यागृहातील ग्राहक हा ‘भादंवि’ कलम ३७०च्या कक्षेत मोडत नसल्यामुळे त्याला अटक करता येणार नसल्याचे सांगत न्यायाधीश भारती डांगरे यांनी ग्राहकाची जामिनावर सुटका केली आहे.

नेहरूनगर पोलिसांनी २०२१ मध्ये वेश्यागृहावर छापा टाकला होता. त्यावेळी या ग्राहकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

त्यानंतर त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर न्या. डांगरे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी आरोपीतर्फे अॅड. प्रभंजय दवे यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी सांगण्यात आले की, ‘आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे; मात्र वेश्यागृहातील मुलगी अल्पवयीन असल्याची त्याला कल्पना नव्हती.

विशिष्ट रक्कम देऊन महिलांसोबत लैंगिक सुख उपभोगता येईल, असे प्रलोभन दाखवल्यानंतर तो वेश्यागृहात आला होता. त्यामुळे पोलिसांची कारवाई चुकीची असून अर्जदाराला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून वेश्यागृहातील ग्राहक हा भादंवि कलम ३७०च्या कक्षेत मोडत नसल्याचे निरीक्षण नोंदवून जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT