Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : निधीसाठी जमीन विकायची का?अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी

राज्याच्या अर्थसंकल्पात सुमार एक लाख कोटी रुपयांच्या लोकप्रिय घोषणांनंतर राज्याच्या तिजोरीवर पडलेला भार पेलताना वित्त विभागाची कसरत सुरु असून याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात सुमार एक लाख कोटी रुपयांच्या लोकप्रिय घोषणांनंतर राज्याच्या तिजोरीवर पडलेला भार पेलताना वित्त विभागाची कसरत सुरु असून याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदार संघातील कामासाठी अतिरिक्त निधीची मागणी करताच चिडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी कुठून आणू, आता काय जमिनी विकायच्या का, असा संतप्त सवाल केल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच गरम झाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते आणि आमदार आपल्या मतदारसंघात जास्तीचा निधी कसा नेता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या विभागाला २५/१५ योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

यावर पैसे नसल्याने आता जमिनी विकाव्या लागतील, असे उत्तर पवार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर प्रत्युत्तर देताना महाजन यांनीही नको तिथे खर्च नको, अशी शासनाची भूमिका असेल तर अनेक ठिकाणी असा खर्च होत असल्याची बाब निदर्शनास आणली. अजित पवार यांनी त्यांच्या गटाच्या आमदाराच्या सिन्नर मतदारसंघातील एका स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला होता. नेमला हाच धागा पकडत ‘नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला,’’ असा सवाल महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT