Mumbai House  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai House : मुंबईत फक्त अडीच लाखांमध्ये घर! महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय

संतोष कानडे

मुंबईः मुंबईमध्ये हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. गृहनिर्माण विभागाने एक शासन निर्णय जारी केला असून केवळ अडीच लाख रुपयांमध्ये घराची मालकी मिळणार आहे.

मुंबईमध्ये झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर दिलं जाणार आहे. १ जानेवारी २००० ते २०११ या काळातील झोपडी धारकांना स्वस्तामध्ये घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला.

यासंदर्भातला शासन निर्णय जारी झाला आहे. झोपडीच्या बदल्यात २ लाख ५० हजारांत मुंबईत घर मिळणार आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतल्या घरांचं स्वप्न साकार होणार आहे. तेही फक्त अडीच लाख रुपयांमध्ये.

मुंबई महानगर पालिका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना आणि झोपडपट्टीधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. २०१८ मध्ये हा विषय चर्चेत आला होता. आज सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.

या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी किती वेळ लागेल हे पाहाणं महत्त्वाचं आहे. हा निर्णय २०१४ ते २०१९मध्ये घेतलेलाच होता, असं माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हटलं असून त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Bhaiyya Mane : ‘आजपासून भैय्या मानेंचा संबंध संपला,’ ४० वर्षे एकत्र असलेल्या भैय्या मानेंवर हसन मुश्रीफांची आगपाखड, भैय्या मानेंचाही पलटवार

IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

SCROLL FOR NEXT