Nana Patole  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वादावर नाना पटोलेंचे एक पाऊल मागे; घेतला मोठा निर्णय

पटोले-थोरात वादावर पडदा पडणार? नाना पटोले म्हणतात चर्चेतून वाद सोडवू

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याचबरोबर आता बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या गटनेते पदाच्या राजीनाम्याबाबत नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. थोरात यांनी राजीनामा दिलं ना पत्र दिलं असं पटोले यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर बसून हा वाद सोडवू असं म्हणत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्याशी समेटीची तयारी नाना पटोले यांनी दाखवली आहे.

नाना पटोले यांनी सरकारनामा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा त्यांनी केला आहे. चर्चेमधून वाद सोडवू अशी भूमिका पटोले यांनी मांडली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील या दुफळीवर मार्ग निघणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

काय म्हणाले आहेत नाना पटोले

बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या पत्राची कॉपी मला दाखवा. असं कुठलही पत्र किंवा राजीनामा दिला नाही मला त्या दोन्ही पैकी कोणतीही कॉपी दाखवा. कोणत्याही वृत्तपत्राने किंवा चॅनेलने ते पत्र दाखवलेल नाही असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.

या सर्व गोष्टीमुळे असं दिसून येत आहे की, त्यांनी पत्र दिलं नाही. राजीनामा दिला नाही. त्यांच पत्र आणि राजीनामा बोलण्यापूरतच आहे. हा वाद आता मिटला आहे. माध्यम हा वाद वाढवत आहेत. आमची चर्चा सुरू आहे असंही नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT