ips prashant Dagale

 

solapur crime

महाराष्ट्र बातम्या

ट्रेनी IPS अधिकाऱ्यांच्या 30 जणांच्या पथकाची सांगोला तालुक्यातील जुगार अड्ड्यावर धाड! 5 लाखांवर रोकड, 25 वाहने जप्त; रात्री उशिरापर्यंत अंमलदार मोजत होते पैसे

सांगोला तालुक्यातील कोळा येथील जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आयपीएस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने रविवारी (ता. ९) रात्री पावणेनऊच्या सुमारास धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेतले आहे. सुमारे पाच लाखांवर रोकड व २५ वाहने जप्त केली आहेत.

तात्या लांडगे

कोळा : सांगोला तालुक्यातील कोळा येथील जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आयपीएस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने रविवारी (ता. ९) रात्री पावणेनऊच्या सुमारास धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेतले आहे. सुमारे पाच लाखांवर रोकड व २५ वाहने जप्त केली आहेत. पोलिसांना पहाताच तिघेजण पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

ग्रामीण पोलिस दलातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून कोळा गावातील महावितरणच्या कार्यालयामागील एका शेतातील घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या नेतृत्वातील पथक तेथे पोचले. पाच अधिकारी व २५ अंमलदारांच्या पथकाने तेथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यावेळी ११ चारचाकी वाहने, १४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. पळून गेलेल्या तिघांच्या वाहनांवरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. कारवाईच्या ठिकाणावरून अंदाजे पाच लाखांवर रोकड जप्त करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम पोलिस अधिकाऱ्यांमार्फत सुरु होते. जुगार खेळणाऱ्या ३६ जणांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लागू शकते.

दरम्यान, कोळा येथील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री. डगळे यांनी ही कारवाई केली. स्थानिक पोलिसांशिवाय त्यांच्या ३० जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाईनंतर सांगोला स्थानिक पोलिसांना धाड टाकल्यासंदर्भात समजले. श्री. डगळे यांनी अचानक टाकलेल्या धाडीमुळे सांगोला तालुक्यातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

अडीच महिन्यातील दुसरी मोठी कारवाई

पंढरपूर विभागातील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्यातील सोनंद येथे जुगार अड्ड्यावर अशीच कारवाई केली होती. त्यावेळी दोन कोटी ६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईत ५० जणांना ताब्यात घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Malegaon News : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; अजित दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वीकारली जबाबदारी

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये अमेरिका इराण युद्धाची झळ,गॅससाठी नागरिकांची मोठी गर्दी

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

SCROLL FOR NEXT