theft

 

solapur sakal

महाराष्ट्र बातम्या

पंढरपूरच्या चोरट्याने 6 जिल्ह्यातून चोरल्या 9 लाखांच्या दुचाकी; सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चोरट्याला पकडले, 4-5 हजारात उसने पैसे घेऊन द्यायचा दुचाकी

पंढरपूरमधील नामदेव बबत चुनाडे याने सोलापूरसह सहा जिल्ह्यांतून आठ लाख ८० हजार रुपयांच्या १५ दुचाकी चोरल्या. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला जेरबंद करीत चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पंढरपूरमधील नामदेव बबत चुनाडे याने सोलापूरसह सहा जिल्ह्यांतून आठ लाख ८० हजार रुपयांच्या १५ दुचाकी चोरल्या. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला जेरबंद करीत चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली होती. सांगोल्यातूनही अशाच प्रकारे एक दुचाकी चोरी झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पथके चोरट्याचा शोध घेत होते. सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाला रेकॉर्डवरील चोरट्याबद्दल माहिती मिळाली. चोरीची दुचाकी विकायला तो पंढरपुरातील शिवाजी चौकात आला. त्यावेळी सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले.

त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सोलापुरातील मोहोळ, सांगोला, अहिल्यानगरातील कर्जत, सांगलीतील कवठेमहांकाळ, आटपाडी, पुण्यातील सासवड, फुरसुंगी, धाराशिवमधील भूम, नाशिकमधील नाशिक या जिल्ह्यांतून १५ दुचाकी चोरल्याचे उघड झाले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.

पैसे लागायचे म्हणून ४-५ हजार घ्यायचा अन्‌...

पोलिसांनी जेरबंद केलेला नामदेव चुनाडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तो मिळेल ते काम करायचा, पण त्यातून त्याचा खर्च भागत नव्हता. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यासाठी तो दुचाकी चोरायचा. ‘मला पैशाची गरज आहे, माझी दुचाकी तुमच्याकडे ठेवा आणि मला चार-पाच हजार द्या, नंतर दुचाकी घेऊन जातो’ म्हणून दुचाकी घेऊन जायचा. तसेच काहींना त्याने कागदपत्रे परत आणून देतो म्हणूनही गाड्या दिल्या होत्या. तो बसने इतर जिल्ह्यांमध्ये जायचा आणि येताना दुचाकी चोरून त्यावर बसून यायचा. पंढरपुरात तो ज्या गल्लीत राहायला आहे, तेथे वेगवेगळ्या ठिकाणी त्याने दुचाकी लावल्या होत्या. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT