zp solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा परिषद ‘सीईओं’च्या दालनाची तोडफोड करणाऱ्यांवर एकूण १२ कलमांन्वये गुन्हा! चौघांना अटक, तिघांचा शोध सुरु

धनगर समाजाच्या जागा भरल्याशिवाय शिक्षक भरती करू नये, अशी घोषणाबाजी करीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनाची तोडफोड केली. शिपाई राम भैरू चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : धनगर समाजाच्या जागा भरल्याशिवाय शिक्षक भरती करू नये, अशी घोषणाबाजी करीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनाची तोडफोड केली. शिपाई राम भैरू चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. चौघांना अटक झाली असून पोलिसांकडून तिघांचा शोध सुरु आहे.

सोमवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा परिषदेत आढावा बैठक सुरु असतानाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर काही युवक आले. त्यातील शरणप्पा शिवराया हांडे (रा. साईनगर, सोलापूर), धनाजी विष्णू गड्डे (रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा), अंकुश केरप्पा गरंडे व सोमनिंग श्रीमंत घोडके (दोघेही रा. बोरगाव, ता. अक्कलकोट) यांच्यासह अन्य एकाने माऊली हळणवार व सुभाष मस्के यांच्या अपप्रेरणेमुळे आपल्याला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात जावून घोषणाबाजी करीत केबिनमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलासमोरील खुर्च्या फेकून दिल्या. दालनातील खिडक्यांच्या काचा फोडून केबिनसमोरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या फलकावर शाईफेक केली. त्यांनी शासकीय मालमत्तेचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

चौघांनाही अटक, उद्या न्यायालयात हजर करणार

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनाची तोडफोड केल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तसेच माऊली हळणवार, सुभाष मस्के (दोघेही रा. पंढरपूर) यांच्यासह अनोळखी एक, अशा एकूण सात जणांविरूद्ध शासकीय कामात अडथळा करून शासकीय कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केली, शासकीय मालमत्तेचे नुकसान केले, अशा एकूण १२ कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्री. कुलकर्णी तपास करीत आहेत. तिघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT