zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

झेडपी शाळेच्या मुख्याध्यापकाची अनोखी शक्कल! गावची यात्रा असल्याचे दाखवून दिली शाळेला सुटी, पण गुरुजी गेले वास्तुशांतीला; शालेय समितीचे अध्यक्ष म्हणाले...

गावात यात्रा असल्याचे दाखवून तडवळ (ता. अक्कलकोट) येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या अधिकारात सोमवारी शाळेला सुटी दिली. त्यांच्यासह सर्वच शिक्षकांनी सहकारी शिक्षकाच्या वास्तुशांती कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चर्चा सोमवारी दिवसभर पसरली होती.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : गावात यात्रा असल्याचे दाखवून तडवळ (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या अधिकारात सोमवारी (ता. २०) शाळेला सुटी दिली. त्यांच्यासह सर्वच शिक्षकांनी सहकारी शिक्षकाच्या सोलापुरातील वास्तुशांती कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चर्चा सोमवारी दिवसभर पसरली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेला सुटी असल्याचे पालकांना सांगितल्याने त्यांचे हे बिंग फुटले. आधीच प्रतिनियुक्त्यांवरुन अक्कलकोट गटशिक्षणाधिकारी कार्यालय वादग्रस्त ठरले असतानाच हा नवा प्रकार उघडकीस आल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.

तडवळ येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंत व कन्नड माध्यमाचे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत उर्दूचेही वर्ग भरतात. या शाळेत मुख्याध्यापक व १२ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेला सोमवारी सुटी देण्यात आली होती. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जायला सांगितल्यावर त्यांनी पालकांना आज शाळेला सुटी असल्याचे सांगितले. आज शाळेला मध्येच सुटी कशाची हा पालकांना प्रश्‍न पडला. हा विषय ग्रामपंचायतीत पोहोचल्यावर गावच्या सरपंचांनी चौकशी केली. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या अधिकारात गावाची यात्रा दाखवून शाळेला सुटी दिल्याची बाब समोर आली. तसेच एका आदर्श शिक्षकाने सोलापूर शहरात बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी शाळेचे सर्व शिक्षक सोलापूरला गेल्याचे कळाले.

अधिक चौकशीत केंद्रप्रमुखाच्या सल्ल्याने मुख्याध्यापकासह शाळेतील शिक्षकांनी यासाठी गावच्या यात्रेची सुटी देण्याची शक्कल लढविली. शालेय समितीच्या अध्यक्षांना मात्र त्यांनी वेगळेच कारण सांगून त्यांची स्वाक्षरी घेतल्याचीही चर्चा होती. तर शिक्षकांच्या या प्रकाराबाबत सरपंच, शालेय आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्यासह पालकांनी आक्षेप नोंदवला आहे. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरुन मी स्वाक्षरी केली

मुख्याध्यापकांच्या अधिकारात वर्षभरात दोन सुट्या घेता येतात. त्या सुट्या मार्चअखेर खर्ची घालाव्या लागतात, असे मुख्याध्यापकांनी मला सांगितले. त्यामुळे मी सुटी घेण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली, पण हा प्रकार मला नंतर समजला आहे.

- संजय कोरे, अध्यक्ष, शालेय समिती, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, तडवळ, ता. अक्कलकोट

गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही

तडवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सुटीसंदर्भात तेथील गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्र केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT