Sharad Pawar
Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'अंधेरीचा न्याय चिंचवडसाठी का नाही?', शरद पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राहुल कलाटे यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात आलं आहे. याच पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या व्यक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन करणाऱ्या शरद पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीबद्दल न्याय का लावला नाही असा सवाल सोशल मिडियावर विचारण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीवेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता, ही निवडणूक अविरोध करणे योग्य राहील. यामुळे महाराष्ट्रात योग्य टु संदेश जाईल. यासाठी निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता. महाराष्ट्रात योग्य तो संदेश देण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे मी संबधितांना आवाहन करतो.

तर कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन केला आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

तर कसबा पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे. ते म्हणाले की कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचं काही कारण नाही. भाजपने कोल्हापूर, आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. त्याचबरोबर देगलूरची निवडणुकही बिनविरोध झाली नाही. एक मुंबईची निवडणूक बिनविरोध झाली. बाकीच्या पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावं. शेवटी लोकशाही आहे. जनतेला हवं त्याला ते निवडून देतील. असं अजित पवार म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT