Best Friend esakal
महाराष्ट्र बातम्या

Best Friend: 'ती स्वप्नात येते, मला बोलाविते'! 'बेस्टफ्रेन्ड'च्या आत्महत्येनंतर तरुणीचा टाेकाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: ‘बेस्टफ्रेंड स्वप्नात येऊन मला बोलाविते’. त्यामुळे सातत्याने तणावात असलेल्या २२ वर्षीय युवतीने विहिरीत उडी घेत आत्महत्या करीत, जीवन संपविले. ही घटना बुधवारी (ता.१४) वाठोड्यातील संताजीनगरात उघडकीस आली. ती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार मोठ्या भावाने दाखल केली होती.

प्रियंका नंदराव सराटे (वय २२, रा. चिराग आईस फ्रॅक्ट्रीजवळ, वाठोडा) असे तरुणीचे नाव आहे. प्रियंका एका चहाच्या दुकानात काम करायची. तिथे तिची संजीवनी नावाच्या मुलीशी मैत्री झाली. त्यातून दोघीचीही मैत्री इतकी घट्ट झाली की, त्या एकमेकींना सर्व काही शेअर करायच्या.

अनेकदा ती संजीवनीकडे राहायची. मात्र, तीन महिन्यांपूर्वी संजीवनीने अचानक आत्महत्या केली. त्यामुळे प्रियंका तणावात गेली. सातत्याने तिच्या आठवणीत राहायची. आपली मैत्रीण आपल्या स्वप्नात येते व आपल्याला बोलाविते असे ती सांगत असे.

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका फार तणावात होती. दरम्यान मंगळवारी ती घरातून निघून गेली. त्यानंतर परत न आल्याने मोठ्या भावाने तक्रार दाखल केली. त्यातून पोलिसांनी शोध घेतला. काल तिचा मृतदेह विहिरीत आढळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

Asian Games, Cricket Live Streaming: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकणार टीम इंडिया? श्रीलंकेविरुद्ध रंगणार फायनल; कुठे पाहाणार?

वृद्धाश्रमात ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू, मुलगा म्हणाला, अंत्यसंस्काराला वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT