Aadesh Bandekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Aadesh Bandekar: अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप; आदेश बांदेकर पोस्ट शेअर करत म्हणाले...

आदेश बांदेकर यांनी आपल्या फेसबूकवरून अर्थिक घोटाळ्याच्या संबधीची पोस्ट केली

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर याबाबत त्यांनी सभागृहात सवालही उपस्थित केले होते. ज्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता शिवभोजन थाळीसाठी न्यासाने बेकायदेशीरपणे 5 कोटी रुपये दिल्याच्या आरोपावरुन आदेश बांदेकर आणि मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्यात देखील चांगलीच जुंपली असल्याचं दिसून आलं आहे.

कोणतीही शाहनिशा न करता आरोप सिद्धिविनायक न्यासावर आरोप करण्यात आले असं म्हणत आदेश बांदेकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. न्यासाच्या अध्यक्षांना असलेल्या राज्यमंत्री पदाच्या राज्यमंत्री दर्जाचा कधीही गैरफायदा घेतला नाही असा दावा बांदेकर यांनी केला होता.

त्यानंतर आदेश बांदेकर यांनी आपल्या फेसबूकवरून यासंबधीची पोस्ट केली आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये आदेश बांदेकर यांनी लिहले आहे की, "माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना .अजूनही मी मर्यादा पाळत आहे."

न्यासाच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री निधीतून पाच कोटींचा चेक देण्यात आला आहे. 25 हजारांपेक्षा जास्त रक्कम देताना शासनाची परवानगी घ्यावी लागते. मग हा चेक देताना अशी परवानगी न्यासाने घेतली होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. अधिवेशनात बोलताना सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या गैरकारभारावर प्रश्न उपस्थित केले होते.

साजूक तुपाचा घोटाळा काय आहे?

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने एका कंपनीकडून 15 ते 16 हजार लीटर साजूक तुपाची खरेदी केली. करोना काळात लॉकडाऊनदरम्यान हे तूप विकून टाकण्यात आले. लॉकडाऊननंतर 2021 मध्ये मंदिर पुन्हा खुले झाल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू केली. या कामासाठी 40-50 लाखांचा खर्च अपेक्षित असताना 3.5 कोटींचे कंत्राट ट्रस्टशी संबधित व्यक्तीला देण्यात आले. मंदिराच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीच्या कामातही बराच गैरव्यवहार झाला आहे. हे आरोप सदा सरवणकर यांनी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

Lasalgaon News : लासलगावमध्ये नायलॉन मांजाचा कहर; युवकाच्या तोंडाला २१ टाके

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT