Aaditya Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray : 'रात्रीच्या शेतीत मुख्यमंत्री काय पिकवतात?' आदित्य ठाकरेंचा सवाल; ठाण्यातून दिलं 'हे' आव्हान

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. निवडणुका, फोडाफोडी, आरोप-प्रत्यारोप या सगळ्याच मुद्द्यांवरुन आदित्यंनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला धारेवर धरलं.

संतोष कानडे

ठाणेः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. निवडणुका, फोडाफोडी, आरोप-प्रत्यारोप या सगळ्याच मुद्द्यांवरुन आदित्यंनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला धारेवर धरलं.

आदित्य ठाकरे म्हणाले की, हेच ठाणं पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण गद्दार निघून गेलेले असले तरी मतदार आमच्यासोबत आहेत. पूर्वी नगरविकास खात्यासाठी एकनाथ शिंदे हे 'मातोश्री'वर येऊन रडले होते, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

''सध्याचे मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला शेतीतलं काय कळतं? आदित्य आत्ता जन्माला आला त्याला शेतीमधलं काय माहिती? पण त्यांची रात्रीची शेती आम्हाला कळालेली नाही. रात्रीच्या शेतीत मुख्यमंत्री नेमकं काय पिकवतात? त्यांच्या गावात जायला साधा रस्ता नाही म्हणून ते दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात आणि शेतात उतरतात. मागच्या काही वर्षात गावात त्यांच्या जागा किती वाढल्या, बंगले किती वाढले हेही महत्त्वाचं आहे.'' असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

विद्यमान सरकारने राज्यात एकही नवीन उद्योग आणलेला नाही. केवळ दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचं काम जोरात सुरुय. ज्यांना आम्ही एवढं सगळं दिलं त्यांनी निर्लज्जपणे पक्ष फोडला. तेही चांगलं काम करत नाहीत. जर तुमची हिंमत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढतो, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.

सध्या एक टीम पक्ष फोडतेय, एक टीम कुटुंब फोडतेय.. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विद्यमान महायुतीच्या सरकारला धारेवर धरलं. ठाण्यामधून त्यांनी रणशिंग फुंकलं असून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. यापूर्वीही त्यांनी वरळीमधून लढण्याचं आव्हान एकनाथ शिंदेंना दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT