Aaditya Thackeray meet kt rama rao during telangana visit k chandrasekhar rao maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray : राजकारणात खळबळ करण्याची क्षमता असणाऱ्या दोन युवराजांची भेट, भावी युतीची नांदी?

रोहित कणसे

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आज (११ एप्रिल) तेलंगानाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आदित्य ठाकरे तेलंगानाचे नेते के टी रामाराव यांची भेट घेतली. के टी आर हे तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सुपुत्र आहेत तसेच तेलंगना मंत्रिमंडळातील अनेक महत्वाची खाती ही त्यांच्याकडे आहेत .

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांची पक्षाने साथ सोडली . यानंतर आदित्य ठाकरे या मागील बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्याचं काम आदित्य ठाकरे यांच्या कडून केलं जात आहे.

महाराष्ट्राप्रमाणे देशात देखील मजबूत मित्र पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावा या उद्देशाने आदित्य ठाकरे हे तेलंगना दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे. यापूर्वी तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली होती. तसेच आगामी काळात ते अखिलेश यादव यांच्यासोबत देखील त्यांची भेट नियोजित आहे.

अगामी वर्ष निवडणूकांचं..

आगामी वर्ष हे निवडणूकांचं वर्ष असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काळात महाराष्ट्रात महानगरपालिका तसेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत त्यामुळे येत्या काळात राजकीय समीकरणे जुळवून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून भक्कम आघाडीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच तेलंगना दौऱ्यादरम्यान गीतम विद्यापीठातर्फे युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

बीसीआर आणि महाराष्ट्र

राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. मागील २-३ महिन्यात त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक छोट्या मोठ्या सभा घेतल्या पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी काम करत आहेत.

के.चंद्रशेखर राव हे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणार प्रवेश करण्याची संधी शोधत आहेत. त्यांनी राज्यात २-३ जाहीर सभा घेतल्या आहेत. सोबतच पक्ष वाढीसाठी मोठ मोठे नेते BRS पक्षात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमिवर आदित्य ठाकरे यांचा तेलंगना दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT