Aditya Thackeray on eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज! 'आत्ता राजीनामा देतो, मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करा...'

संतोष कानडे

मुंबईः भाजपच्या टीकेला उत्तर देतांना आदित्य ठाकरे यांनी थेट चॅलेंज दिलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

'वरळीमध्ये निवडणुका होऊ द्या, मग कळेल कोणाचा पोपट मेला आहे' असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यावर बोलतांना आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय.

आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आधी माझ्यासमोर निवडणुकीसाठी उभं करा, मी आज राजीनामा देतो. असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात कुठेही दंगली घडल्या नव्हत्या. परंतु शिंदे सरकारच्या काळात अनेक ठिकाणी दंगली घडत आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दंगली घडवल्या जात आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट वरळीतून उभं राहण्याचं चॅलेंज दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला त्यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : 'पॅलेट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं'; प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

MPSC Exam: 'एमपीएससी'चं चाललंय काय? अपात्र उमेदवारांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय; माहिती व जनसंपर्क विभागाची भरती प्रक्रिया कासवगतीने

SCROLL FOR NEXT