Aditya Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

शहाजीबापू पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ; 'या' दिवशी जाहीर सभा

आदित्य ठाकरे सोलापूर दौऱ्यावर

सकाळ डिजिटल टीम

Aaditya Thackeray: कृषीमंत्री अब्दुल्ल सत्तार यांना घेरण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं आता नवी रणनिती आखली आहे. त्यानुसार आता आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला बुलडाणा आणि सिल्लोडला सभा घेणार होते. मात्र त्यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे.

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना जे नुकसान सोसावं लागलं त्यासाठी त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे 9 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून सांगोला तालुक्यात सभा घेणार असल्याची माहिती सेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिली.

आदित्य ठाकरे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेऊन सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे शिंदेंच्या बंडानंतर अधिक सक्रीय झाले आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेताची बांधावर जाऊन पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. याच गावातून शहाजीबापू पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MRP Protest Delhi: एमआरपीतील त्रुटींविरोधात जंतर-मंतरवर राष्ट्रीय आंदोलन; महाराष्ट्रातून ५०० कार्यकर्ते नवी दिल्लीत रवाना

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेक्षणाला तीव्र विरोध

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

Ayub Pathan story in Balbharti Class 4 Marathi: बालभारतीच्या चौथीच्या मराठी पुस्तकात अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ला स्थान

SCROLL FOR NEXT