Aarey tree felling challenged before Supreme Court Aarey Forest Update  sakal
महाराष्ट्र बातम्या

आरेतील वृक्षतोडीला SC मध्ये आव्हान, सरन्यायाधिशांचे महत्वाचे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर करण्याचे निर्देष दिले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारने बंदी उठवल्याने मुंबई मेट्रोचे आरे येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी उठवली आहे त्यामुळे कारशेड आरे येथे होणार असल्याचं स्पष्ट झालं.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून कारशेडचे काम बंद होते. आता ही बंदी उठवल्याने या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आणि झाडे तोडली जाणार याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

आरे येथील झाडे वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणवादी संघटना पुढे आल्या होत्या, त्यांच्याकडून आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी सरकारकडून कारशेडच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. मेट्रोच्या कार्यकारी संचालक असलेल्या आश्विनी भिडे यांची बदली केली होती पण शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा आश्विनी भिडे यांच्याकडे सोपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT