Rajesh-Tope 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : राज्यातील ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण - राजेश टोपे

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटीलेटर, अडीच लाख एन ९५ मास्क उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे संवाद सांगितले.

राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत सोशल डिस्टंसिंग राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ९ लाख लोकांचं ट्रेसिंग करण्यात आले आहे. याकामासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आवश्यकता भासल्यास राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे यासाठी राज्यातील आर्युवेदीक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांची सेवा घेता यावी याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Sports News: महाराष्ट्र केसरी विजेत्यांचा शड्डू ऑलिंपिकमध्ये घुमेना, मराठी मल्ला मागे का पडतात?

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Indian Theatre Documentary 1988 : भारतीय नाट्य परंपरेचा दस्तऐवज; जब्बार पटेल यांचा 'इंडियन थिएटर' लघुपट

SCROLL FOR NEXT