solapur city police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

अबब..! सोलापुरातील तडीपार दोन चोरट्यांनी चोरले १४ लाख रुपयांचे मोबाईल; चोरीचे मोबाईल घेणारा दुकानदार जेरबंद; जेलरोड पोलिसांची कारवाई

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून चोरीचे १३ लाख ९२ हजार ९९८ रुपयांचे मोबाईल विकत घेणाऱ्या दुकानदारास जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. फारूक महमद हनिफ पठाण (वय ४२, रा. सिद्धेश्वर पेठ, शहापूर चाळ) असे त्याचे नाव आहे. याला मोबाईल विकणाऱ्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून चोरीचे १३ लाख ९२ हजार ९९८ रुपयांचे मोबाईल विकत घेणाऱ्या दुकानदारास जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. फारूक महमद हनिफ पठाण (वय ४२, रा. सिद्धेश्वर पेठ, शहापूर चाळ) असे त्याचे नाव आहे. याला मोबाईल विकणाऱ्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

सोलापूर शहर-ग्रामीण आणि विजयपूरसह अन्य शहरांतील बाजारपेठा, यात्रेतून गणेश ऊर्फ अप्पा तुकाराम बैरुणगी व लखन तुकाराम बैरुणगी (दोघेही रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) यांनी तब्बल १११ महागडे मोबाईल चोरले होते. ते मोबाईल दोघांनीही मोबाईल विक्रेता फारूक पठाण याला विकले होते. दरम्यान, चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गणेश व लखन बैरुणगी यांना शहर पोलिसांनी डिसेंबर महिन्यात तडीपार केले आहे. या कारवाईपूर्वी म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात त्या दोघांनी चोरीचे मोबाईल विकले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. चोरीचे मोबाईल घ्यायला इक्बाल मैदानाजवळ आलेल्या फारूकला पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यावेळी त्याने ही कबुली दिली.

ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक एम. डी. नदाफ, शरीफ शेख, गजानन कगणगिरी, वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, भारत गायकवाड, संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाणे, युवराज गायकवाड, उमेश सावंत, इकरार जमादार, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने पार पाडली.

‘आयएमईआय’वरून मालकांचा शोध

चोरट्यांकडून विकत घेतलेल्या मोबाईलमधील काही मोबाईल फ्लॅश मारण्यात आले आहेत. १४ लाख रुपयांचे १११ महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आता मोबाईलच्या ‘आयएमईआय’ क्रमांकावरून मूळ मालकांचा शोध घेऊन ते त्यांना परत दिले जातील, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT