अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार
महाराष्ट्र बातम्या

'भविष्यातही मुख्यमंत्री शिवसेनेचाच'- मंत्री अब्दुल सत्तार

मंत्री अब्दुल सत्तार हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हे विधान केले आहे

प्रमोद सरवळे

जालना: राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील धुसपूस दिसून येत आहे. कारण काही काँग्रेस नेते नाना पटालेंनी (nana patole) यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यावर शिवसेनेकडूनही त्यास प्रत्युत्तर देण्यात आले होते. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पुढील काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल स्पष्ट केले होते. तर आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनीही नाना पटोलेंच्या विधानाला प्रत्युत्तर देत पुढील साडेतीन वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असं सांगितले. तसेच भविष्यातही शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा दावाही मंत्री सत्तार यांनी केला

मंत्री अब्दुल सत्तार हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हे विधान केले आहे. नाना पटोले यांनी पहिले स्वबळावर त्यांचे आमदार निवडून आणावेत मग बोलावे असा टोलाही सत्तार यांनी पटोलेंना लगावला. नाना पटोलेंनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीची वाटचाल कशी असेल हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सत्तार हे येणाऱ्या जालना जिल्ह्यातील नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यावर ठेऊन संघटनात्मक बैठकीसाठी जिल्ह्याच्या दोऱ्यावर आले होते. यावेळी माजी मंत्री अर्जून खोतकर, विनोद घोसाळकर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीनंतर मंत्री सत्तार बोलत होते. यावेळी काँग्रेसकडून होणाऱ्या महत्त्वकांक्षेवर सत्तार यांनी भाष्य करत नाना पटोले यांनी टोलाही लगावला.

नाना पटोले यांच्या विधानानंतर आता जालना नगरपालिकेच्या निवडणुकतही शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरू केली आहे. आम्ही नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस जर स्ववळावर लढले तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT