Ramdas Kadam sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam: सुभाष देसाई कान चावणारा माणूस; कदमांची अर्वाच्च भाषेत टीका

सकाळ डिजिटल टीम

अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारीच घेतलीय. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं आजुबाजूला लागतात… असं म्हणत रामदास कदम यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद चालू असतानाच राम कदमांचीही जीभ घसरली. शिवसेना नेत्यांवर त्यांनी अर्वाच्च भाषेत टीका केली आहे.

शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी राज्यात नव्या वादाला तोंड फोडले आहे. अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारीच घेतलीय. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं आजुबाजूला लागतात. असं म्हणत रामदास कदमांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. यावेळी त्यांनी परब यांच्यासह सुभाष देसाई आणि विनायक राऊतांचाही उल्लेख केला.

सुभाष देसाई हा कान चावणारा आणि कानात बोलणारा माणूस आहे. जोपर्यंत हे नेते उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूला आहेत, तोपर्यंत त्या पक्षाचं काहीही खरं नाही. अशा अर्वाच्च भाषेत रामदास कदम यांनी सेना नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

तसेच, परब यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला पाहिजे. त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होत आहे? हेच मला कळत नाही. माझ्या मुलावर सगळ्यात जास्त अन्याय अनिल परबांनी केलाय. दापोली आणि मंडणगडची नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात होती. पण अनिल परबांनी माझा मुलगा योगेश कदम यांना बाजुला ठेऊन, या नगरपरिषदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम केलं. असा आरोपही कदम यांनी सेना नेत्यांवर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT