Abhijeet Bichukale 
महाराष्ट्र बातम्या

Abhijeet Bichukale : "गजानन काळे म्हणजे गांजा..." ; अभिजीत बिचुकले आता मनसेला नडले

सकाळ डिजिटल टीम

Abhijeet Bichukale : मनसे नेते गजानन काळे यांच्यावर अभिजीत बिचुकले यांनी पलटवार केला आहे. आजपासून गजानन काळे यांचे नाव गांजा काळे असे बिचुकले यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात काळे यांनी अभिजीत बिचुकले आणि संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. 

"सकाळी-सकाळी राऊत बोलायला सुरूवात करतात. मला ईडीला विचारायला लागेल यांना तुरुंगात टाकलं होतं की वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं. सकाळी सकाळी संजय राऊत कडक गांजा मारतात. संजय राऊतांना वाटतं तेच भगवान आहेत. ऐवढा आत्मविश्वास महाराष्ट्रात दोनचं मानसांमध्ये आहे. एक संजय राऊत आणि दुसरे अभिजीत बिचुकले", असे गजानन काळे म्हणाले होते. 

दरम्यान अभिजीत बिचुकले यांनी जोरदार पलटावर केला आहे. "त्या माणसाचे नाव काय आहे. त्याला आज नाव देतो. राज ठाकरे आमचे बंधू आहेत. राज ठाकरे यांना सांगतो तुमचा जो पदाधिकारी आहे. त्याचे नाव आजपासून गांजा काळे आहे. तुझ्या घरात येईन तुला फरफरटत नेईन आणि राज ठाकरे यांच्यासमोर कृष्णकूंजवर तुझं कानफाड फोडीनं. तू गांजा ओढला का?, तुझ्या रक्तात गांजा आहे का?. राज ठाकरे आहेत म्हणून उड्या मारु नको," असे बिचुकले यांनी ठणकावून सांगितले. 

"गांजा काळे हे नाव संपूर्ण महाराष्टाने लक्षात ठेवावे. त्याचं नाव आता गजानन काळे नाही. संजय राऊत आणि तुमचे काही वैर असेल. तुमच्या ७०० पिढ्यांना माहित आहे का? अभिजीत बिचुकले कोण आहे. अभिजीत बिचुकलेंची जात, धर्म महाराष्ट्राच्या नावात आहे," असे देखील बिचुकले यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT