Abhishek Ghosalkar Firing esakal
महाराष्ट्र बातम्या

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मृत मॉरिसविरोधात गुन्हा दाखल; दोघांना घेतलं ताब्यात

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने गोळ्या झाडल्या त्या मॉरिस नावाच्या गुंडानेही स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मॉरिसविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष कानडे

मुंबईः माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने गोळ्या झाडल्या त्या मॉरिस नावाच्या गुंडानेही स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मॉरिसविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

abhishek ghosalkar murder case

मुंबईत गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्ह करुन मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे हा सगळा प्रकार सोशल मीडियात व्हायरल झाला. त्याने ५ गोळ्या झाडून अभिषेक यांची हत्या केली.

दहिसर गोळीबारप्रकरणी आता पोलिसांनी मृत आरोपी मॉरिसविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 302 तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमान्वये कलम 37 (1) (अ), आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने 'एएनआय'ने ही माहिती दिली.

दरम्यान, अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईचा पीए मेहूल पारिख आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेतलं आहे. गोळीबार होण्यापूर्वी मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात झालेल्या संभाषणामधून मेहूल पारिख याच्या नावाचा उल्लेख झालेला होता.

याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. व्हिडीओमध्ये दोघे गप्पा मारत होते. दोघांचं संभाषण स्पष्ट आहे. ते ऐकल्यावर दोघांचे मित्रत्वाचे संबंध असून चांगली ओळख असल्याचं दिसत आहे. याचा कसून तपास झाला पाहिजे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असल्याचं पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT