Maharashtra Board Time Table sakal
महाराष्ट्र बातम्या

बोर्डाच्या परीक्षेपूर्वी अभिषेकच्या स्वप्नांचा चुराडा! दिवाळीला भावजीकडे जाताना इयत्ता बारावीच्या वर्गातील अभिषेकचा अपघातात तुटला उजवा हात

दिवाळी सुट्ट्या लागल्याच्या आनंदात अभिषेक १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भावजींना भेटायला जात होता. वाटेत अभिषेकच्या सायकलीचा अपघात झाला. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या अभिषेकला दवाखान्यात घेऊन न जाता ट्रक चालक तसाच पसार झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, इन्फेक्शन (संक्रमण) होऊ नये म्हणून त्याचा उजवा हात दंडापासून कट करावा लागला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : कुचन प्रशालेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणारा अभिषेक श्रीनिवास कंदीकटला (रा. श्रमजीवी निलम नगर, सोलापूर) याची १८ ऑक्टोबरला परीक्षा संपली होती. दिवाळी सुट्ट्या लागल्याने तो सायकलीवरून भावजीकडे निघाला होता. अभिषेकने सर्व मित्रांना हस्तांदोलन करीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पण, काही अंतरावर गेल्यावर भरधाव ट्रकने त्याच्या सायकलीला कट मारला आणि अभिषेकच्या उजव्या हातावरुन ट्रकचे मागील टायर गेले. त्यात त्याचा हात कट करावा लागला आहे.

दिवाळी सुट्ट्या लागल्याच्या आनंदात अभिषेक १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भावजींना भेटायला जात होता. वाटेत अभिषेकच्या सायकलीचा अपघात झाला. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या अभिषेकला दवाखान्यात घेऊन न जाता ट्रक चालक तसाच पसार झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, इन्फेक्शन (संक्रमण) होऊ नये म्हणून त्याचा उजवा हात दंडापासून कट करावा लागला.

दरम्यान, अपघातानंतर तो खूपच घाबरला होता. त्यामुळे त्याला ज्या वाहनाने धडक दिली, त्याचे वर्णन त्याला सांगता आलेले नाही. त्याच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिस त्या वाहनाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अपघाताच्या वेळेत त्या रस्त्यावरून गेलेल्या वाहनांचा शोध सुरू केला आहे. अपघाताची खबर मिळताच त्याचे आई-वडील, बहिणींनी दवाखान्यात धाव घेतली. अभिषेकला पाहून त्यांना हुंदका आवरता आला नाही. अभिषेकवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिस हवालदार मनोज माने तपास करीत आहेत.

अभिषेक एकुलता एक मुलगा

अभिषेकची आई विडी वळण्याचे काम करते, तर वडील पॉवरलूममध्ये मजूर आहेत. त्याच्या दोन बहिणींचा विवाह झाला असून एक बहीण अविवाहित आहे. दहावीत ६५ टक्के गुण घेऊन अभिषेकने अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेतला. आता तो इयत्ता बारावीत शिकत असून त्याची बोर्डाची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. तो ज्या हाताने लिखाण करायचा, तोच उजवा हात त्याचा अपघातात तुटला आहे. त्यामुळे तो स्वत: व त्याचे आई-वडील चिंतेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

SCROLL FOR NEXT