Strike 
महाराष्ट्र बातम्या

संपावरील ग्रामसेवकांची २२ दिवस गैरहजेरीच

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी २२ दिवस राज्यभर संप केला होता, त्याकाळात गावगाडा ठप्प झाला होता. हा संप नुकताच मिटला आहे. पण, त्यांनी २२ दिवस केलेल्या संपाच्या कालावधीत गैरहजेरी लावण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी २२ ऑगस्टपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू केला होता. जवळपास २२ दिवसांनंतर त्यांचा संप १३ सप्टेंबरला मिटला. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन ग्रामविकासमंत्र्यांनी दिल्यामुळे संघटनांनी संप मागे घेतला. संघटनेच्या मागण्या मार्गी लागण्याची आशा निर्माण झाल्याने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, संपाच्या कालावधीतील कामाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. जेवढे दिवस ग्रामसेवक संपावर होते, तेवढे दिवस त्यांच्या खाती असलेल्या अर्जित रजेमध्ये या २२ दिवसांच्या रजा परिवर्तित करण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सांगितले आहे. 

एवढेच नाही, तर ज्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खाती अर्जित रजा शिल्लक नसतील, तर संपाच्या काळात त्यांची गैरहजेरी मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने केलेल्या संपाचा फटका राज्यातील ग्रामसेवकांना बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. संपाच्या संदर्भात ग्रामविकास विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे याबाबत संघटना नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

अर्जित रजेमधून संपाचे दिवस वजा करून ग्रामसेवकांचे वेतन घ्यावे लागणार आहे. सरकारने काढलेले पत्रक योग्य आहे. अनेक ग्रामसेवकांच्या अर्जित रजा शिल्लक असतात. 
- टी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; कोयता गँग, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवार यांचे पोलिसांना निर्देश

Prithviraj Chavan : मतदारसंघ पुनर्रचना करा, मात्र राज्यांचे जागावाटप बदलू नका; खासदारसंख्या वाढवण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्पष्ट

TDR Rules Pune : पुणे महापालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना दणका; टीडीआर आणि प्रीमियम एफएसआय देण्याबाबत आयुक्तांचे कडक परिपत्रक

Health Minister : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पाचोड ग्रामीण रुग्णालयाला रात्री अचानक भेट; रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

Delimitation Commission: SIR नंतर आता मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारीही ज्ञानेश कुमार यांच्याकडेच?

SCROLL FOR NEXT