ajit pawar -Chandrakant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या बैठकीला अजित पवारांची गैरहजेरी

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील कालवा समितीची बैठक पार पडत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील कालवा समितीची बैठक पार पडत आहे. पुण्यात पाणीकपात होणार का हे या बैठकीत ठरणार आहे. तर या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे वेळापत्रक बदलल्यामुळे अजित पवार त्यांच्या पुढील कामासाठी रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरवात झाली आहे. पुण्याच्या आसपास असणाऱ्या धरणांमद्धे जुलै महिन्यांपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घ्यावा का? यासंबधीची चर्चा या कालवा समितीच्या बैठकीत होणार होती. अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहणार होते.

या बैठकीच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे अजित पवार पुढील कार्यक्रमाला रवाना झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झाली आहे. काल रात्री अजित पवार यांना वेळ बदलण्यात आल्याचे कळवण्यात आले. त्यानंतर पवारांनी एक मेसेज पाठवला आहे. त्यांचे आधीचे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरले असून ते त्यांना टाळता येणं शक्य नव्हतं त्यामुळे ते अनुपस्थित आहेत.

पुणेकरांच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची बैठक आहे. पुणे शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरण क्षेत्रामध्ये कमी पाणीसाठा आहे. शहरात वेळ पडली तर पाणीकपात करावी का यावर चर्चा होणार होती. यासाठी अजित पवार अनुपस्थित आहेत. कारण या बैठकीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT