Accident news 
महाराष्ट्र बातम्या

Accident : मित्राच्या लग्नासाठी निघालेले तीन युवक अपघातात ठार; पेंडगाव शिवारात वाहन पलटी

सकाळ डिजिटल टीम

नेवासे : मित्राच्या लग्नाच्या आनंदी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नेवासे येथून बीडला भरधाव वेगात निघालेल्या मोटारीच्या अपघातात तीन युवक जागीच ठार तर एक जण जखमी झाला. शुक्रवारी (ता.२३) पहाटे अडीच वाजता धुळे-सोलापूर मार्गावरील पेंडगाव शिवारात हा अपघात झाला.

धीरज गुंदेचा (वय ३०), रोहन वाल्हेकर (वय ३२), विवेक कांगुणे (वय ३३ ) हे जागीच ठार झाले तर आनंद वाघ (वय २८) हे गंभीर जखमी झाले आहेत.

येथील चैतन्य दिलीप कुलकर्णी याच्या विवाहास गुरुवारी (ता.२२) रोजी रात्री नऊ वाजता दोन मोटारीतून नऊ मित्र बीडला जाण्यासाठी रवाना झाले होते. रात्री उशिरा हाॅटेलात जेवण करुन दोन्ही वाहने विवाहास उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले. मंगल कार्यालय काही किलोमीटर अंतरावर आले असताना चालकाचे नियंत्रण सुटले.

त्यामुळे मोटारीने चार ते पाच पलट्या घेतल्या. या अपघाताची माहिती समजताच महामार्गाचे पोलिस व पाठोपाठ रात्रीच्या गस्तीवर असलेले बीड ग्रामीणचे पोलिस कर्मचारी लक्ष्मण जायभाय व रवी सानप यांनी मदतकार्य केले.

पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित रणखांब व पथकाने चक्काचूर झालेल्या वाहनातून तीन मृतदेह बाहरे काढले. जखमी आनंद वाघ यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत वाल्हेकर व कांगुणे नेवाशातील सदाशिव काॅलनीतील रहिवासी तर गुंदेचा व जखमी वाघ विवेकानंदनगर येथे राहणारे आहेत.

अपघाताचे कारण अस्पष्ट

धुळे-सोलापूर रस्त्यावरील पार्वती पेट्रोल पंप परिसरात अपघात झाला. मात्र या अपघाताचे कुणीच साक्षीदार पुढे आले नसल्याने जखमीचा जबाब झाल्यानंतर नेमके कारण समजेल असे हवालदार जयसिंग वाघ यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT